27 नोव्हेंबर चालू घडामोडी वनलायनर नोट्स
● जागतिक हवामान बदल शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री 30 नोव्हेंबरपासून 2 दिवसाच्या दुबई दौऱ्यावर
संयुक्त राष्ट्र हवामान बदल आराखडा परिषदेंतर्गत कॉप-28 चे हे शिखर संमेलन संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. हे संमेलन 28 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री मोदी शिखर संमेलनात सहभागी होणाऱ्या काही नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकाही घेतील.
● इफ्फीत युनिसेफच्या सहकार्यानं बालहक्कांसदर्भातील 5 चित्रपटांचे प्रदर्शन
गोव्यात सुरु असलेल्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीमध्ये UNICEF च्या सहकार्याने बालहक्कांसदर्भातील 5 चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यामध्ये 2 भारतीय तर 3 इराणी आणि श्रीलंकन चित्रपटांचा सहभाग आहे. राष्ट्रीय पुस्कारप्राप्त राजा सेन यांनी दिग्दर्शित केलेला बंगाली चित्रपट दामू आणि मनिष साईनी दिग्दर्शित गुजराती चित्रपट गांधी आणि कंपनी या भारतीय चित्रपटांचा यात समावेश आहे. संजीव पुष्पकुमार दिग्दर्शित सिन्हालीज चित्रपट, पिकॉक लॅमेंट, अलीरेझा मोहम्मदी रौजबहानी दिग्दर्शित पर्शियन चित्रपट ‘सिंगो’ यांचाही यात समावेश आहे. यावर्षी, UNICEF आणि राष्ट्रीय चित्रपट विकास प्राधिकरण अर्थात (NFDC), महोत्सवाचे आयोजक,असून चित्रपट उद्योग आणि प्रेक्षकांचं लक्ष बाल हक्कांकडे वेधण्याच्या उद्देशानं ते एकत्र आले आहेत.
● बंगालच्या उपसागराला धडकणार ‘मिचांग’ हे चक्रीवादळ
बंगालच्या उपसागराच्या पलीकडे आगामी चक्रीवादळ मिचांग येऊन धडकणार आहे. ‘मिचांग’ हे चक्रीवादळाचे नाव म्यानमार देशाने ठेवलेले आहे.
● ‘ज्ञानोदय एक्सप्रेस-‘कॉलेज ऑन व्हील्स’ एक्सप्रेस ला हिरवा झेंडा
लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी वैष्णवी देवी कटरा रेल्वे स्टेशन पासून ‘ज्ञानोदय एक्सप्रेस-‘कॉलेज ऑन व्हील्स’ एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे विविध राज्यातून मार्गक्रमण करेल आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक तीर्थक्षेत्र म्हणून काम करेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कॉलेज ऑन हिल्सचे आयोजन करण्यात आले आहे.
● पंकज अडवाणीने IBSF जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2023 चे विजेतेपद पटकावले. त्याचे हे 27 वे विजेतेपद ठरले, त्याने अंतिम फेरीत सौरव कोठारीचा पराभव केला.
● केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी 37 PM श्री केंद्रीय विद्यालये आणि 26 PM श्री जवाहर नवोदय विद्यालयांचे ओडिशात शुभारंभ केले. प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया (PM SHRI) योजना, देशभरातील हजारो शाळा विकसित करण्याचा हेतू आहे.
● केरळच्या रिस्पॉंसिव्ह टुरिरिझम ला UNWTO यादीत मान्यता
युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO) च्या केस स्टडीजच्या प्रतिष्ठित यादीमध्ये केरळच्या प्रसिद्ध रिस्पॉन्सिबल टुरिझम (RT) मिशनने आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली आहे. ही मान्यता तळागाळातील विकासासाठी केरळच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनावर आणि UN च्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी (SDGs) पर्यटनाला संरेखित करण्यावर भर देते.
● केंद्र सरकारने सध्याच्या आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्रांचे (AB-HWCs) नाव बदलून ‘आयुष्मान आरोग्य मंदिर’ अशी घोषणा केली आहे.
● भारतीय फर्म Merlinhawk Aerospace ने तमिळनाडू संरक्षण कॉरिडॉरमध्ये उत्पादन आणि डिझाइन सुविधा स्थापन करण्यासाठी इटलीच्या Vega Composites सह संयुक्त उद्यम करारावर स्वाक्षरी केली.
● केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी जारी केलेला मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकी 2023 अहवाल, 2022-23 या आर्थिक वर्षात भारतातील दूध, अंडी आणि मांस उत्पादनात भरीव वाढ दर्शवितो. मार्च 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान झालेल्या प्राण्यांच्या एकात्मिक नमुना सर्वेक्षणावर आधारित हा अहवाल पशुधन क्षेत्राच्या कामगिरीबद्दल अंतर्दृष्टी प्रदान करतो.
● हॅमफेस्ट इंडिया 2023 या 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन 25 नोव्हेंबर 2023 रोजी विज्ञान भवन, सायन्स सिटी, अहमदाबाद, गुजरात येथे दळणवळण राज्यमंत्री श्री देवुसिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आले.
● सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या स्टार भारतीय जोडीने चायना मास्टर्स 2023 स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत सात्विक-चिराग जोडीचा लिआंग-वांग यांच्याकडून पराभव झाला.
● भारताने दुसऱ्या T20I सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 44 धावांनी पराभव केला आणि 2-0 अशी आघाडी घेतली
● मॅक्स वर्स्टपनने अबु धाबी GP मध्ये F1 हंगामातील 19 वा विजय मिळवला.
● रामकुमार रामनाथनने $25,000 ITF पुरुष टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत राष्ट्रीय चॅम्पियन सिद्धार्थ विश्वकर्माचा पराभव केला.