26 नोव्हेंबर चालू घडामोडी वनलायनर नोट्स
● देशभरात सर्वत्र आज संविधान दिन साजरा
देशभरात सर्वत्र आज संविधान दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केले.
● इफ्फीत युनिसेफच्या सहकार्याने बालहक्कांसदर्भातील 5 चित्रपटांचे प्रदर्शन
गोव्यात सुरु असलेल्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफी मध्ये युनिसेफच्या सहकार्याने बालहक्कांसदर्भातील पाच चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यामध्ये 2 भारतीय तर 3 इराणी आणि श्रीलंकन चित्रपटांचा सहभाग आहे. राष्ट्रीय पुस्कारप्राप्त राजा सेन यांनी दिग्दर्शित केलेला बंगाली चित्रपट दामू आणि मनिष साईनी दिग्दर्शित गुजराती चित्रपट गांधी आणि कंपनी या भारतीय चित्रपटांचा यात समावेश आहे. इराणी चित्रपट निर्माते मोहसीन सीराजी यांचा पर्शिअन चित्रपट, फॉर द सेक ऑफ इवा, संजीव पुष्पकुमार दिग्दर्शित सिन्हालीज चित्रपट, पिकॉक लॅमेंट, अलीरेझा मोहम्मदी रौजबहानी दिग्दर्शित पर्शियन चित्रपट ‘सिंगो’ यांचाही यात समावेश आहे. हे चित्रपट बालपणाला आकार देणारे विविध स्त्रोत, त्याचे सामाजिक-आर्थिक संदर्भ, बालकांवर होणारे अत्याचार, महिला आणि किशोरवयीन मुलांवरील चित्रपट यावर भाष्य करतात. यावर्षी, युनिसेफ आणि राष्ट्रीय चित्रपट विकास प्राधिकरण अर्थात (NFDC), महोत्सवाचे आयोजक,असून चित्रपट उद्योग आणि प्रेक्षकांचं लक्ष बाल हक्कांकडे वेधण्याच्या उद्देशानं ते एकत्र आले आहेत.
● राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 7 ते 20 डिसेंबरपर्यंत नागपुरात होणार
राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 7 डिसेंबरपासून नागपुरात सुरु होणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आणि विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
● 25 नोव्हेंबर हा दिवस महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो.
● भारताच्या श्वेतक्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांची जयंती 26 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय दूध दिवस म्हणून साजरी केली जाते.
● सुखविंदर सिंग सुखू यांनी संकलित आणि संपादित केलेले ‘स्नेक स्पीसीज ऑफ हिमाचल प्रदेश’ हे पुस्तक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेचे प्राचार्य, डॉ. ओमेश कुमार भारती आणि डॉ. डी.डी. ने प्रकाशित केले आहे.
● राज्यातील प्राथमिक ते वरिष्ठ माध्यमिक स्तरापर्यंत 2050 शाळांना 2026-2027 पर्यंत टप्प्याटप्प्याने मुख्यमंत्री स्कूल ऑफ एक्सलन्स बनवले जाईल.
● हिमाचल प्रदेश राज्य सरकारने सौरऊर्जा प्रकल्पांच्या स्थापनेवर तरुणांना 40 टक्के अनुदान देण्याची घोषणा केली आहे.
● उपग्रह ब्रॉडबँडसाठी अंतराळात मंजुरी मिळवणारी पहिली कंपनी वनवेब इंडिया आहे.
● चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या रहस्यमय विषाणूचे नाव H9N2 (एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस) आहे.
● भारत आणि युरोपियन युनियन दरम्यान सेमीकंडक्टर करारावर स्वाक्षरी झाली आहे.
● भारत देश आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे अध्यक्षपद भूषवेल.
● ISR ने काळी मिरीची उच्च उत्पन्न देणारी जात “चंद्रा” नावाने विकसित केली आहे.
● नॅशनल मेटलर्जिस्ट अवॉर्ड 2022 अंतर्गत यंग मेटलर्जिस्ट (पर्यावरण) पुरस्काराने डॉ. निलॉय कुंडू यांना सन्मानित करण्यात आले आहे.
● FICCI चे निर्वाचित अध्यक्ष म्हणून महिंद्रा समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश शहा यांना नामांकन करण्यात आले आहे.
● नमो ॲपचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून कुलजीत सिंग चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.