सिद्धरामय्या दुसऱ्यांदा होणार कर्नाटकच्या मुख्यमंत्री; तर डी. के. शिवकुमार होणार उपमुख्यमंत्री

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत,

तर कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहतील.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांची निवड केली.

मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी कार्यक्रम 20 मे रोजी पार पडणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने बाजी मारत सर्वाधिक 135 विधानसभा जागा जिंकल्या तर भाजप ने 66, JD(S) ने 19 आणि इतर पक्षांनी 4 जागा जिंकल्या.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment