जाहिरात : संयुक्त गट ब व गट क सेवा पूर्व परीक्षा 2023

जाहिरात : संयुक्त गट ब व गट क सेवा पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या एकूण 8,169 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाहिरात (क्रमांक 01/2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

⭕️ ASO : 70+8 = 78 जागा

⭕️ STI : 159 जागा

⭕️ PSI : 374 जागा

⭕️ दुय्यम निबंधक (श्रेणी 1) / मुद्रांक निरीक्षक : 49 जागा

⭕️ Excise SI : 6 जागा

⭕️ तांत्रिक सहाय्यक : 01 जागा

⭕️ कर सहाय्यक : 468 जागा

⭕️ लिपिक – टंकलेखक : 7034 जागा

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण ८१६९ पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३ रविवार, दिनांक ३० एप्रिल, २०१३ रोजी महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल.

 

पात्रता :-

भारतीय नागरिकत्व

वयोमर्यादा :-

वयोमर्यादा गणण्याचा दिनांक: १ मे, २०२३.

विविध अराजपत्रित प्रवर्ग/ उपप्रवर्गासाठी किमान व कमाल मर्यादा :-

 

 

शैक्षणिक पात्रता :-

उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.

उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-
(१) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा
(२) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.

पदविका / पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. परंतु मुख्य परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज / माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदविका / पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.

अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने ही अट मुख्य परीक्षेचा अर्ज / माहिती स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यत पूर्ण केली असली पाहिजे.

मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता :-

पोलीस उपनिरीक्षक तसेच दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाकरीता विकल्प नमूद करणा-या उमेदवारांकडे उपरोक्त अर्हतेसोबत खालीलप्रमाणे किमान शारीरिक अर्हता असणे आवश्यक आहे.

 

 

टंकलेखन अर्हता :-

कर सहायक व लिपिक-टंकलेखक संवर्गासाठी उपरोक्त शैक्षणिक अर्हतेसोबत खालीलप्रमाणे टंकलेखन अर्हता असणे आवश्यक आहे :-

कर सहाय्यक :-

मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

लिपिक – टंकलेखक :-

मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

 

संपूर्ण जाहिरात Download करण्यासाठी :-    Download Now

काय आहे पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम ?

१) इतिहास :-
आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.

२) भूगोल :-
महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश- रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.

३) अर्थव्यवस्था
भारतीय अर्थव्यवस्था :-
राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी.
शासकीय अर्थव्यवस्था :-
अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.

४) चालू घडामोडी :-
जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील.

५) राज्यशास्त्र

६) सामान्य विज्ञान :-
भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).

७) अंकगणित :-
बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी

८) बुध्दिमापन चाचणी :-
उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न

 

संपूर्ण अभ्यासक्रम Download करण्यासाठी        Download Now

 

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment