
१. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०१ ते १३ जुलै, २०२४ रोजी नियोजित लिपिक टंकलेखक -२०२३ व कर सहायक २०२३ या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
२. टंकलेखन कौशल्य चाचणी कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय चाचणीस प्रवेश दिला जाणार नाही.
३. टंकलेखन कौशल्य चाचणीस विहित केलेल्या दिनांकास उपस्थित राहताना उमेदवारांनी त्यांची ज्या भाषेतून टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे त्या भाषेचे मराठीसाठी ३० श.प्र.मि. व इंग्रजीसाठी ४० श.प्र.मि. वेगमर्यादेचे मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापुर्वी (दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२३ पुर्वी) निर्गमित झालेल्या टंकलेखन प्रमाणपत्राची स्वसाक्षांकित प्रत सोबत घेऊन येणे व प्रवेशावेळी जमा करणे अनिवार्य आहे. अन्यथा अंतिम शिफारशीसाठी त्यांचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
४. टंकलेखन कौशल्य चाचणीच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणा-या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, चाचणी सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित चाचणी उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष चाचणी सुरु होण्याच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर चाचणी कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा विचार करता उमेदवारांनी त्यांच्या चाचणीच्या किमान एक दिवस अगोदर चाचणी केंद्र कोठे आहे याचा अंदाज घ्यावा जेणेकरुन चाचणीवेळी केंद्रावर पोहोचण्यास अडचण होणार नाही.
५. टंकलेखन कौशल्य चाचणी कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना चाचणी कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
६. आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना, परीक्षेच्या वेळी शारीरिक / परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही / उपाययोजना संदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणा-या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.
७. प्रवेशप्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact- secretary@mpsc.gov.in किंवा support-online@mpsc.gov.in या ईमेल आणि अथवा ७३०३८२१८२२ किंवा ०२२६९१२३९१४ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.
Clerk & Tax Assistant Skill Test Hall Ticket Download Now