आदिवासी विकास विभाग भरती 2023
Tribal Development Department Recruitment 2023
Adivasi Vikas Vibhag Bharti 2023
● सरळसेवा भरती – 2023
● गट (ब) अराजपत्रित संवर्ग व गट क संवर्ग
● आदिवासी विकास विभागांतर्गत आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या अधिपत्याखालील तसेच नियुक्ती प्राधिकारी अपर आयुक्त, नाशिक/ठाणे/अमरावती/नागपूर यांच्या आस्थापनेवरील गट (ब) अराजपत्रित व गट क संवर्गातील सरळसेवा कोटयातील विविध संवर्गातील 602 पदांच्या सरळसेवा भरतीकरीता पात्र उमेदवारांकडून विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक २३.११.२०२३ ते १३.१२.२०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.
● सदर पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परिक्षा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक | 23/11/2023 दुपारी 3pm पासून |
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा व विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | 13/12/2023 रात्री 11:55 PM पर्यंत |
जाहिरात पहा | Download Now |
1) परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी आदिवासी विकास विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल.
2) ऑनलाइन अर्ज भरण्याची पध्दत व ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशिल, वेतनश्रेणी, विहित वयोमर्यादा / वयोमर्यादा शिथिलता, निवड पध्दत, सर्वसाधारण अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाइन परिक्षेचा अभ्यासक्रम, परिक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी तपशिल https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.
3) स्पर्धात्मक परिक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अशंतः बदल करणे, पदाच्या एकूण व संवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना राहतील. व त्यांचा निर्णय अंतिम असेल. याबाबत कोणताही दावा करता येणार नाही. तसेच दर्शविण्यात आलेल्या समांतर आरक्षणाचा पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच राखीव प्रवर्गातील इतर पात्र उमेदवारांचा शासन विहित नियमानुसार विचार केला जाईल, सदरील पदभरती प्रक्रियेसंदर्भात वाद, तक्रारी, उद्भवल्यास त्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना राहतील.