स्पेनच्या कार्लोस अल्कराझने पटकावले विम्बल्डन ग्रँडस्लॅम विजेतेपद.
स्पेनच्या कार्लोस अल्कराझने प्रबळ प्रतिस्पर्धी नोव्हाक जोकोव्हिचचा विम्बल्डन स्पर्धेत 5 सेट मध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले.
अल्कराझने प्रबळ प्रतिस्पर्धी नोव्हाक जोकोव्हिचचा 1-6, 7-6 (8-6), 6-1, 3-6, 6-4 असा विजय मिळविला.
20 वर्षीय कार्लोस अल्कराझचे हे कारकीर्दीतील पहिले विम्बल्डन तर एकूण दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे.
मागील वर्षी कार्लोस अल्कराझने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद त्याने पटकावले होते.
जोकोव्हिचला 2017 नंतर विम्बल्डनमध्ये प्रथमच पराभव पत्करावा लागला.
मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक 24 ग्रँडस्लॅम विजेतेपदांची बरोबरी करण्याची जोकोव्हिचची संधी हुकली.
याचबरोबर रॉजर फेडररच्या 8 विम्बल्डन विजेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची जोकोव्हिचची संधी देखील हुकली.
चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोन्ड्रोउसोवाने पटकावले विम्बल्डन ग्रँडस्लॅम विजेतेपद.
चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोन्ड्रोउसोवाने प्रबळ प्रतिस्पर्धी ट्युनिशियाच्या ओन्स जाबेऊर हिचा विम्बल्डन स्पर्धेत 2 सेट मध्ये पराभव करत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.
24 वर्षीय मार्केटा वोन्ड्रोउसोवाने अंतिम फेरीत ओन्स जाबेऊर हिचा 6-4, 6-4 असा सरळ सेट मध्ये पराभव केला.
मार्केटा वोन्ड्रोउसोवाने विम्बल्डन स्पर्धेत पहिली बिगरमानांकित विजेती होत इतिहास रचला.
मार्केटा वोन्ड्रोउसोवाचे हे कारकीर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. यापूर्वी ती 2019 च्या फ्रेंच ओपन ची उपविजेती ठरली होती.
ट्युनिशियाच्या ओन्स जाबेऊर हिला मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीदेखील
विम्बल्डनच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
मार्केटा वोन्ड्रोउसोवा जागतिक क्रमवारीत 42 व्या स्थानी आहे.
दक्षिण विभागाने पटकावले दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
दक्षिण विभागाने पश्चिम विभागाचा ७५ धावांनी पराभव करत दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
यासोबतच दक्षिण विभागाचे हे 14 वे दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद ठरले.
प्रमुख वेगवान गोलंदाज विदवाथ कावेरप्पा याने अंतिम सामन्यात 8 फलंदाज बाद केले. त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने स्पर्धेमध्ये 15 फलंदाज बाद केले. त्यामुळे त्याचीच मालिकावीर म्हणूनही निवड करण्यात आली.
जून 2023 महिना 174 वर्षांतील सर्वांधिक उष्ण महिना.
पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस खूपच वाढतच असून या वर्षीच्या जून महिना जगभरात आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण महिना ठरला.
जून महिन्याच्या जुन्या विक्रमापेक्षा यंदाच्या जूनमध्ये 0.13 ℃ अधिक तापमानाची नोंद झाली.
जागतिक महासागरांमध्ये सलग 3 ऱ्या महिन्यांत विक्रमी तापमानाची नोंद झाली त्यामुळे जूनने यापूर्वीचा तापमानाचा विक्रम मोडल्याची माहिती अमेरिकेच्या राष्ट्रीय महासागरी व वातावरणीय प्रशासनाने (नोआ) दिली.
‘नासा’ आणि ‘नोआ’ या संस्थेतील वैज्ञानिकांनी केले हे सर्वेक्षण केले आहे.
Thank you