
केंद्र सरकारच्या वतीने सोमवारी भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी रवनीत कौर यांची निवड करण्यात आली.
रवनीत कौर या 1988 च्या पंजाब केडरच्या IAS अधिकारी आहेत.
रवनीत कौर यांची नियुक्ती 5 वर्षांसाठी करण्यात आली आहे.
स्पर्धा आयोगाचे याआधीचे अध्यक्ष अशोककुमार गुप्ता हे होते. गुप्ता ऑक्टोबर 2022 मध्ये निवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त होते.
ऑक्टोबर 2022 पासून स्पर्धा आयोगाच्या सदस्या असलेल्या संगीता वर्मा या हंगामी अध्यक्ष म्हणून काम करत होत्या. आता त्या स्पर्धा आयोगाच्या पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतील.
भारतीय स्पर्धा आयोग बद्दल :-
14 ऑक्टोबर 2003 रोजी भारतीय स्पर्धा आयोगाची स्थापना करण्यात आली.
स्पर्धा कायदा, 2002 अंतर्गत भारतीय स्पर्धा आयोग स्थापन करण्यात आला आहे.
भारतीय स्पर्धा आयोगाचे पहिले अध्यक्ष धनेंद्र कुमार हे होते.