MPSC प्रसिध्दीपत्रक पुढीलप्रमाणे :-
विषय :- महाराष्ट्र गट- क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२४, लिपिक टंकलेखक, कर सहायक, बेलिफ व लिपिक, गट-क, नगरपाल (शेरीफ), मुंबई या संवर्गातील तीनपट अर्हता प्राप्त उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याबाबत.
संदर्भ :- १) जाहिरात क्रमांक -११८/२०२५
महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२४, मधील कर सहायक, लिपिक टंकलेखक, बेलिफ व लिपिक, गट-क, नगरपाल (शेरीफ), मुंबई या संवर्गाची टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी तीन पट अर्हता प्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
२. सदर तीन पट अर्हता प्राप्त उमेदवारांची यादी ही निव्वळ टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणी अंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये / शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो.
३. खेळाडू प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची क्रीडाविषयक कागदपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिका-यांनी तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला आहे व त्यांचा तीन पट अर्हता प्राप्त उमेदवारांची यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
४. प्रस्तुत परीक्षेच्या अधिसूचनामधील तरतूद क्रमांक १०.३. (५) नूसार कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या दिव्यांग, माजी सैनिक, व अनाथ प्रवर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांना शासनाच्या धोरणानुसार टंकलेखन कौशल्य चाचणीत सूट असल्यामूळे सदर प्रवर्गातून आरक्षणाचा दावा करणा-या उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणी देण्याची आवश्यकता नाही मात्र प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी या प्रवर्गातील उमेदवारांना कर सहायक संवर्गासाठी मराठी व इंग्रजी भाषेतील टंकलेखन कौशल्य चाचणी अनिवार्य राहील.
५. प्रस्तुत तीन पट अर्हता प्राप्त उमेदवारांची यादी मा. न्यायालय / मा. न्यायाधिकरण येथे दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.
६. टंकलेखन कौशल्य चाचणी अर्हताकारी / पात्रता (Qualifying) स्वरुपाची असून त्याबाबत उमेदवारांना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रकाद्वारे स्वंतत्ररित्या कळविण्यात येईल.
MPSC अधिकृत संकेतस्थळ लिंक :- येथे क्लिक करा
https://mpsc.gov.in
जा. क्र. 118/2025 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा – 2024 – लिपिक टंकलेखक – टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी :- येथे क्लिक करा
जा. क्र. 118/2025 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा – 2024 – कर सहायक – टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी :- येथे क्लिक करा
जा. क्र. 118/2025 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा – 2024 – बेलिफ व लिपिक, गट-क, नगरपाल (शेरीफ), मुंबई – टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी :- येथे क्लिक करा
जा. क्र. 118/2025 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा – 2024 – लिपिक टंकलेखक – टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवार CutOff खालीलप्रमाणे

जा. क्र. 118/2025 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा – 2024 – कर सहायक – टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवार CutOff खालीलप्रमाणे

जा. क्र. 118/2025 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा – 2024 – बेलिफ व लिपिक, गट-क, नगरपाल (शेरीफ), मुंबई – टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवार CutOff खालीलप्रमाणे

चालू घडामोडी FREE TEST खालीलप्रमाणे
चालू घडामोडी Test : 12 डिसेंबर 2025 Click Here
1 ते 11 डिसेंबर 2025 प्रश्न येथे क्लिक करा
नोव्हेंबर 2025 प्रश्न येथे क्लिक करा
ऑक्टोबर 2025 प्रश्न येथे क्लिक करा