
Combine Group C Pre Exam 2024 Answer Key | महाराष्ट्र गट- क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ प्रथम उत्तरतालिका प्रसिद्ध
परीक्षेचे नांव : महाराष्ट्र गट-क सेवा, संयुक्त (पूर्व) परीक्षा – २०२४ (जाहिरात क्रमांक ०४९/२०२४)
परीक्षेचा दिनांक : ०१ जून, २०२५
MPSC प्रसिद्धीपत्रक पुढील प्रमाणे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०१ जून, २०२५ रोजी आयोजित “महाराष्ट्र गट- क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ “या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर उत्तरतालिकासंदर्भात उमेदवारांना हरकती सादर करावयाच्या असल्यास त्यांनी आयोगाकडून दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या प्रसिध्दीपत्रकातील तरतुदीनुसारच ऑनलाईन पध्दतीने सादर कराव्यात.
२. विहीत ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने /पध्दतीने सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. यासंदर्भात दिनांक ०९ जून, २०२५ पर्यंत आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतींचीच दखल घेतली जाईल.
महाराष्ट्र गट- क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ प्रथम उत्तरतालिका Download Answer Key

