ASO Limited Departmental Exam 2025 | सहायक कक्ष अधिकारी, गट-ब (अराजपत्रित) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५

ASO Limited Departmental Exam 2025 | सहायक कक्ष अधिकारी, गट-ब (अराजपत्रित) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५

फक्त मंत्रालयीन विभागातील लिपिक-टंकलेखक संवर्गातील कर्मचा-यांना सहायक कक्ष अधिकारी पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र २०२५ फक्त मुंबई येथे संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने लोकसेवा आयोगामार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येईल. प्रस्तुत परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल

अर्ज सादर करण्याचा कालावधी
दिनांक ०६ जून, २०२५, रोजी १४.०० ते दिनांक २६ जून, २०२५ रोजी २३:५९

ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक
दिनांक २६ जून, २०२५ रोजी २३:५९

भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक
दिनांक २८ जून, २०२५ रोजी २३:५९

चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक
दिनांक ३० जून २०२५ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये

प्रस्तुत परोक्षेमधून भरावयाच्या मंत्रालयीन विभागातील पदांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे:-

३.१ वेतनश्रेणी:- ९-१६ : ४४९००-१४२४००

३.२ पदसंख्या: फक्त मंत्रालयीन विभाग एकूण २३ पदे (एकूण पदांपैकी ०१ पद स्वमग्नता (Autism) / मंदबुध्दी किवा आकलन क्षमतेची कमतरता

(Intellectual Disability) / विशिष्ट शिक्षण अक्षमता (Specific Learning Disability)

मानसिक आजार (Mental Illness) तसेच बहिरेपणा व अंधत्वासह एकापेक्षा जास्त प्रकारचे

दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींकरीता आरक्षित आहे.)

३.३ वर नमूद पदसंख्येमध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे.

३.४ मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ च्या अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार पदे भरण्यात येतील.

● ४. पात्रता :-

४.१ फक्त मंत्रालयीन विभागाच्या आस्थापनेवरील कार्यरत लिपिक-टंकलेखक संवर्गातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेस अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

मंत्रालयीन विभागाच्या अधिपत्याखालील इतर कोणत्याही दुय्यम कार्यालयातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेकरीता अर्ज करण्यास पात्र नाहीत.

४.२ जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास, म्हणजेच दिनांक २६ जून, २०२५ रोजी लिपिक-टंकलेखक संवर्गामध्ये नियमित सेवेची किमान पाच वर्षे सेवा पूर्ण झालेले कर्मचारी प्रस्तुत परीक्षेकरीता अर्ज करण्यास पात्र आहेत.

४.३ नियमित सेवेचा कालावधी खालीलप्रमाणे गणण्यांत येईल:-

(१) आयोगामार्फत नामनिर्देशनाने नेमणूक झालेले कर्मचारी नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून

(२) अनुकंपा तत्वावर लिपिक-टंकलेखक म्हणून नेमणूक झालेले कर्मचारी नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून

(३) लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नत कर्मचारी नियमित पदोन्नतीच्या दिनांकापासून

(४) अन्य कारणास्तव सेवा नियमित झालेले कर्मचारीः सेवा नियमित केल्यासंबंधीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशाच्या दिनांकापासून,

(५) लिपिक-टंकलेखक पदावरील नियमित सेवेचा कालावधी लिपिक-टंकलेखक पदाच्या ज्येष्ठतासूचीमध्ये नमूद केलेल्या दिनांकापासून गणण्यात येईल

४.४ कोणत्याही परिस्थितीत लिपिक-टंकलेखक संवर्गातील पदावरील अभावित नियुक्तीचा कालावधी पात्रतेसाठी गणण्यात येणार नाही.

४.५ लिपिक-टंकलेखक पदांकरीता विहित केलेली सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण न झालेले अथवा सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट दिलेली नाही, तसेच स्थायित्व प्रमाणपत्र प्राप्त केलेले नाही असे कर्मचारी प्रस्तुत परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असणार नाहीत.

४.६ परीक्षेच्या जाहिरातीच्या दिनांकास विभागीय चोकशी प्रलंबित असलेले लिपिक-टंकलेखक सदर परीक्षेस बसण्यास अपात्र असतील.

● ६. परीक्षा योजना :-

६.१ परीक्षेचे टप्पे एक लेखी परीक्षा

६.२ परीक्षेचे स्वरुप : वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

६.३ प्रश्नपत्रिका : दोन

६.४ एकूण गुण:- २००

६.५ प्रस्तुत परीक्षेची परीक्षा योजना व सविस्तर अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावरील Candidate Information > Examination > Syllabus of Examination या सदराखाली उपलब्ध आहे.

६.६ लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल.

७. निवडप्रक्रिया :-

७.१ जाहिरातोमध्ये नमूद अर्हता पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशोसाठी पात्र असणार नाही.

७.२ सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया सहायक कक्ष अधिकारी, गट-ब (अराजपत्रित) पदावर निवडीने नियुक्ती मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा नियम २०२२ अथवा तदनंतर शासनाकडून बेळोवेळी करण्यात येणा-या सुधारणा तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणाऱ्या कार्यनियमावलीतील तरतुदींनुसार राबविण्यात येईल.

७.३ भरती प्रक्रियेदरम्यान अंतिम शिफारस यादी/निवड यादी तयार करताना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांचे क्रमांकन/प्राधान्य क्रमवारी (Ranking) समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांच्या क्रमांकन/प्राधान्य क्रमवारीबाबत आयोगाच्या दिनांक १२ सप्टेंबर, २०२२ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार निश्चित करण्यात येईल

● ८. भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे (Opting out option) :-

८.१ अंतिम शिफारसीपूर्वी परीक्षानिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी (General Merit List) तसेच तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल,

८.२ तात्पुरती निवड यादीच्या आधारे भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (ऑप्टिंग आऊट) पर्याय सादर करण्यासाठी संबंधित उमेदवारांना ७ दिवसांचा कालावधी देण्यात येईल ८.३ भरतीप्रक्रियेमधून बाहेर पडण्याचा पर्याय सादर केलेल्या उमेदवारांचा विदा (Data) लक्षात घेऊन अंतिम शिफारस यादी (Final Recommendation List)

तयार करण्यात येईल. ८.४ पदभरतीकरीता भरतीप्रक्रियेतून बाहेर पडणेबाबतची कार्यवाही फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे विहित कालावधीमध्ये करणे अनिवार्य आहे.

यासंदर्भातील इतर कोणत्याही पद्धतीने केलेल्या तसेच नंतरच्या टण्यावर पर्याय रद्द करण्यासंदर्भात केलेल्या विनंतीचा विचार केला जाणार नाही.

● ९. परीक्षेकरीता अर्ज करण्याची पध्दत :-

९.१ अर्ज सादर करण्याचे टप्पे :-

९.१.१ आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रमाणालीवर यापुर्वी विहित पद्धतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून खाते (Profile) तयार करणे.

९.१.२ खाते तयार केलेले असल्यास व ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्पास अद्ययावत करणे.

९.१.३ विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने खालीलप्रमाणे लागू असेल त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अर्ज सादर करणे.

९.१.४ परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे,

९.२ विहित कागदपत्रे/प्रमाणपत्रे अपलोड करणे:- यासाठी जाहिराती मधील ९.२ हा मुद्दा संपूर्ण पाहून घ्या.

९.३ सर्वसाधारण:

(एक) अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.

(दोन) अर्ज सादर करण्याकरीता आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन Login करा

तीन) अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

( चार) आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

९.४ परीक्षा शुल्काचा भरणा :-

९.४.१ परीक्षा शुल्क (रुपये):

(एक) अमागास रु. ७१९/-

(दोन) मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग रु. ४४९/-

(तीन) उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बैंक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.

(चार) परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.

९.४.२ अर्ज सादरीकरणाचे टप्पे पूर्ण झाल्यावर उपलब्ध होणाऱ्या ‘Submit and Pay fees’ या बटनवर क्लिक केल्यानंतर किवा मुख पृष्ठावरील ‘माझे खाते’ या सदराखालील अर्ज केलेल्या पदांच्या यादीतील ‘Fees not Paid अशी सद्यस्थिती लिहिलेल्या जाहिरात/पद/परीक्षेसमोरील ‘ Pay Now’ या लिंकवर क्लिक करुन परीक्षा शुल्काचा भरणा करता येईल,

● नोकरी ठिकाण :- महाराष्ट्र

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 26 जून 2025

● परीक्षा :- अधिकृत वेबसाईटवर नंतर कळविण्यात येईल.

● जाहिरात (PDF) पहा :- येथे Click करा

● Online अर्ज लिंक :- येथे Click करा

● अधिकृत संकेतस्थळ :- येथे Click करा

● Age Calculator :-

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

● Telegram Channel Link :- JOIN NOW

स्पर्धा परीक्षा Updates Whatsapp Channel Link :- JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment