Mumbai Police Bharti Result | मुंबई पोलीस शिपाई निकाल जाहीर
आज दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३, मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२२-२३ तसेच दक्षिण विभाग, कारागृह शिपाई भरती २०२२-२३ तात्पुरती अंतरिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.
दक्षिण विभाग, कारागृह शिपाई भरती २०२२-२३ ची मैदानी चाचणी प्रक्रिया दिनांक १९/०७/२०२४ ते १६/०९/२०२४ या कालावधीत घेण्यात आली आहे. तसेच लेखी परिक्षा दिनांक ११/०१/२०२५ रोजी मुंबईतील विविध शाळा/महाविद्यालयांमध्ये घेण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ याच्या नियम ८ मधील, पोट-नियम (तीन-अ) राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) “क” प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार, पाच अधिकच्या (बोनस) गुणांसाठी पात्र राहतील. यानूसार मैदानी चाचणी व लेखी परिक्षेमध्ये प्राप्त झालेल्या गुणांमध्ये (एनसीसी) “क” प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारांना सदर तरतुदीनुसार ५ गुण अधिकचे देण्यात आले आहेत.
शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांनुसार तात्पुरती अंतरिम निवड यादी mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर निवड यादी ही निव्वळ कागदपत्र पडताळणीच्या तसेच इतर प्रमाणपत्रांच्या पडताळणीच्या अधिन राहून तयार करण्यात आली आहे. त्यामुळे सदर निवड यादीत आलेल्या उमेदवारांची निवड ही अंतिम निवड झाली असल्याचे समजण्यात येऊ नये.
सदर निवड यादीबाबत उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास दिनांक ०७/०२/२०२५ रोजी रात्री २१:०० वा. पासून दिनांक ०८/०२/२०२५ रोजी रात्री २१:०० वा. पर्यंत desk9recruitcell.mum@mahapolice.gov.in या ई-मेल आयडीवर आक्षेप नोंदवावेत. दिनांक ०८/०२/२०२५ रोजी रात्री २१:०० वाजेनंतर प्राप्त होणाऱ्या ई-मेल व विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही.
याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
दक्षिण विभाग, कारागृह शिपाई भरती २०२२-२३ तात्पुरती अंतरिम निवड यादी Click Here to Download Result
मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२२-२३ ची मैदानी चाचणी प्रक्रिया दिनांक १९/०७/२०२४ ते १६/०९/२०२४ या कालावधीत घेण्यात आली आहे. तसेच लेखी परिक्षा दिनांक ११/०१/२०२५ रोजी मुंबईतील विविध शाळा/महाविद्यालयांमध्ये घेण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस शिपाई (चालक) सेवाप्रवेश नियम, २०१९ व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांनुसार मुंबई पोलीस शिपाई (चालक) पदाच्या मैदानी चाचणी व लेखी परिक्षेमध्ये उमेदवारांना प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे तात्पुरती अंतरिम निवड यादी mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर निवड यादी ही निव्वळ कागदपत्र पडताळणीच्या तसेच इतर प्रमाणपत्रांच्या पडताळणीच्या अधिन राहून तयार करण्यात आली आहे. त्यामुळे सदर निवड यादीत आलेल्या उमेदवारांची निवड ही अंतिम निवड झाली असल्याचे समजण्यात येऊ नये.
सदर निवड यादीबाबत उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास दि ०७/०२/२०२५ रोजी रात्री २१:०० वा.पासून दि ०८/०२/२०२५ रोजी रात्री २१:०० वा.पर्यंत desk9recruitcell.mum@mahapolice.gov.in या ई-मेल आयडीवर आक्षेप नोंदवावेत. दिनांक ०८/०२/२०२५ रोजी रात्री २१:०० वाजेनंतर प्राप्त होणाऱ्या ई-मेल व विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही.
याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२२-२३ तात्पुरती अंतरिम निवड यादी Click Here to Download Result
मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३ ची मैदानी चाचणी प्रक्रिया दिनांक १९/०७/२०२४ ते १६/०९/२०२४ या कालावधीत घेण्यात आली आहे. तसेच लेखी परिक्षा दिनांक १२/०१/२०२५ रोजी मुंबईतील विविध शाळा/महाविद्यालयांमध्ये घेण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ याच्या नियम ८ मधील, पोट-नियम (तीन-अ) राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) “क” प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार, पाच अधिकच्या (बोनस) गुणांसाठी पात्र राहतील. यानूसार मैदानी चाचणी व लेखी परिक्षेमध्ये प्राप्त झालेल्या गुणांमध्ये (एनसीसी) “क” प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारांना सदर तरतुदीनुसार ५ गुण अधिकचे देण्यात आले आहेत.
शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांनुसार तात्पुरती अंतरिम निवड यादी mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर निवड यादी ही निव्वळ कागदपत्र पडताळणीच्या तसेच इतर प्रमाणपत्रांच्या पडताळणीच्या अधिन राहून तयार करण्यात आली आहे. त्यामुळे सदर निवड यादीत आलेल्या उमेदवारांची निवड ही अंतिम निवड झाली असल्याचे समजण्यात येऊ नये.
सदर निवड यादीबाबत उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास दिनांक ०७/०२/२०२५ रोजी रात्री २१:०० वा. पासून दिनांक ०८/०२/२०२५ रोजी रात्री २१:०० वा. पर्यंत desk recruitcell.mum@mahapolice.gov.in या ई-मेल आयडीवर आक्षेप नोंदवावेत. दिनांक ०८/०२/२०२५ रोजी रात्री २१:०० वाजेनंतर प्राप्त होणाऱ्या ई-मेल व विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही.
याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३ तात्पुरती अंतरिम निवड यादी Click Here to Download Result