
WTA फायनल्स | कोको गॉफने जिंकली WTA फायनल्स टेनिस स्पर्धा जिंकली
🔰 WTA फायनल्स ही WTA टूरची सीझन-एंड चॅम्पियनशिप आहे.
🔰 महिलांच्या वार्षिक कॅलेंडरमधील चार प्रमुख स्पर्धांनंतरची ही सर्वात महत्त्वाची टेनिस स्पर्धा आहे, कारण त्यामध्ये संपूर्ण हंगामातील त्यांच्या निकालांवर आधारित शीर्ष आठ एकेरी खेळाडू आणि शीर्ष आठ दुहेरी खेळाडू सहभागी होतात.
🔰 अमेरिकेच्या कोको गॉफने चीनच्या झेंग किनवेन हिचा ३-६, ६-४, ७-६ (७-२) असा पराभव करत मानाची डब्ल्यूटीए फायनल्स टेनिस स्पर्धा जिंकली.
🔰 विसाव्या वर्षी ही स्पर्धा जिंकणारी गेल्या वीस वर्षांतील ती पहिलीच टेनिसपटू ठरली आहे.
🔰 20 व्या वर्षी ही स्पर्धा जिंकणारी गेल्या 20 वर्षातील पहिलीच टेनिसपटू
🔰 तिने अंतिम फेरीत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या झेंग हिचा पराभव केला
🔰 सेरेना विल्यम्सनंतर (२०१४) डब्ल्यूटीए फायनल्स टेनिस स्पर्धा जिंकणारी गॉफ अमेरिकेची पहिलीच टेनिसपटू
🔰 मारिया शारापोव्हानंतर (२००४) सर्वांत कमी वयात ही स्पर्धा जिंकणारी गॉफ पहिलीच टेनिसपटू
🔰 शारापोव्हाने कमी वयात हा पराक्रम केला त्याच २००४ यावर्षी गॉफचा जन्म झाला होता.
🔰 या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंच्या प्रवासात गॉफने अरिना सबालेन्का (क्रमवारीत पहिली) आणि इगा स्वियातेक (क्रमवारीत दुसरी) या अव्वल दोन टेनिसपटूंना नमवले