महाज्योती निकाल 2024 | Mahajyoti Result 2024
Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute (MAHAJYOTI)
(An Autonomous Institute of The Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt. of Maharashtra)
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारकार्याचा वसा चालविण्यासाठी, त्यांच्या विचारातला सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) स्थापना शासन निर्णय दि.०८.०८.२०१९ अन्वये (कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत कलम ८ नुसार) केली आहे. या अंतर्गत लक्षीत प्रवर्गासाठी उद्देशीत कार्यक्षेत्र व विशेष घटक स्थापिले आहेत.
महाज्योती मार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास – प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी या हेतूने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, JEE/NEET/MHT-CET, MPSC, UPSC आदी स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात येते.
महाज्योती, मार्फत सन 2024-25 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), संघ लोकसेवा आयोग (UPSC), महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व क महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, केंद्रीय कर्मचारी निवड आयोग (SSC-CGL), IBPS-PO/LIC/Railway/Banking परीक्षा पूर्व प्रशिक्षणांकरीता विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षांचे निकाल आज दि.25/09/2024 रोजी दु.2.00 वाजता पर्यंत महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाहीर करण्याची शक्यता आहे. तरी संबंधित विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या संकेतस्थळावर भेट देत राहावे.
महाज्योतीच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाशी संबंधित विविध योजनांच्या लाभार्थी निवडीकरीता सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) आयोजित करण्यात आली होती.
महाज्योती सर्व निकाल Download Now
● Telegram Channel Link JOIN NOW
● Whatsapp Channel Link JOIN NOW