NIRF Ranking 2024 | NIRF रँकिंग 2024

http://www.nirfindia.org

NIRF Ranking 2024 | NIRF रँकिंग 2024

● केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकतीच राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (National Institutional Ranking Framework, NIRF) जाहीर केले आहे. दरवर्षी जाहीर होणाऱ्या एनआयआरएफ रॅंकींगमध्ये विविध मानदंडांच्या आधारे भारतातील उच्च शिक्षण संस्थांचे मुल्यांकन आणि रॅंकींग केले जाते. 

● या वर्षी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) ने NIRF रँकिंग 2024 च्या विद्यापीठ श्रेणीमध्ये पाचव्यांदा अव्वल स्थान पटकावले आहे. जेएनयू तिसऱ्यांदा दुसऱ्या स्थानावर आहे.

● जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ तिसरा क्रमांक मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.

● मणिपाल अकादमिक ऑफ हायर एज्युकेशन चौथे आणि बीएचयूला पाचवे स्थान मिळाले आहे. 

राज्य विद्यापीठांच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

● एकूण 13 श्रेणींमध्ये NIRF क्रमवारी जाहीर केली आहे. ज्यात विद्यापीठे, महाविद्यालये, संशोधन संस्था, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, वैद्यकीय, दंत, कायदा, वास्तुकला आणि नियोजन, कृषी आणि संबंधित क्षेत्रे आणि नवोपक्रम यांचा समावेश आहे.

● गेल्या वर्षी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc), बेंगळुरूने विद्यापीठाच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते.

NIRF Ranking 2024: देशातील शीर्ष 10 विद्यापीठांची यादी
1. IISc बंगळुरू
2. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU)
3. जामिया मिलिया इस्लामिया
4. मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन
5. बनारस हिंदू विद्यापीठ
6. दिल्ली विद्यापीठ
7. अमृता विश्व विद्यापीठम्
8. अलीगढ मुस्लिम विद्यापीठ
9. जाधवपूर विद्यापीठ
10. वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी


● NIRF Ranking 2024: अभियांत्रिकीमधील शीर्ष संस्था-

1. IIT मद्रास
2. आयआयटी दिल्ली
3. आयआयटी बॉम्बे
4. आयआयटी कानपूर
5. IIT खरगपूर
6. आयआयटी रुरकी
7. आयआयटी गुवाहाटी
8. आयआयटी हैदराबाद
9. एनआयटी तिरुचिरापल्ली
10. IIT-BHU वाराणसी

NIRF Ranking 2024: ओव्हरऑल टॉप 10 संस्था-
1. IIT मद्रास
2. IISc बेंगळुरू
3. आयआयटी बॉम्बे
4. आयआयटी दिल्ली
5. आयआयटी कानपूर
6. IIT खरगपूर
7. एम्स, नवी दिल्ली
8. आयआयटी रुरकी
9. आयआयटी गुवाहाटी
10. जेएनयू, नवी दिल्ली

NIRF Ranking 2024: व्यवस्थापनातील संस्था-
1. आयआयएम अहमदाबाद
2. आयआयएम बंगलोर
3. आयआयएम कोझिकोड
4. आयआयटी दिल्ली
5. आयआयएम कलकत्ता
6. आयआयएम मुंबई
7. आयआयएम लखनौ
8. आयआयएम इंदूर
9. एक्सएलआरआय, जमशेदपूर
10. आयआयटी बॉम्बे

NIRF Ranking 2024: राज्य विद्यापीठांची क्रमवारी
1. अण्णा विद्यापीठ, चेन्नई
2. जाधवपूर विद्यापीठ, कोलकाता
3. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
4. कलकत्ता विद्यापीठ, कोलकाता
5. पंजाब विद्यापीठ, चंदीगड
6. उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद
7. आंध्र विद्यापीठ, विशाखापट्टणम
8. भरथियार विद्यापीठ, कोईम्बतूर
9. केरळ विद्यापीठ, तिरुवनंतपुरम
10. कुसॅट, कोचीन

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment