Mathematics & Reasoning Test 1 | अंकगणित & बुद्धिमत्ता टेस्ट 1

● अंकगणित & बुद्धिमत्ता टेस्ट 1

● मित्रांनो अंकगणित & बुद्धिमत्ता साठी उपयुक्त 20 मार्क ची टेस्ट उपलब्ध करून दिली आहे.

● सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

● 20 पैकी किमान 12 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा.

● आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.

● अशा पद्धतीने दररोज टेस्ट चा सराव करा आणि आपला अभ्यास समृद्ध बनवा.

● काही शंका असल्यास Comment करा.

/20
536
Created by chalughadamodimpsc

Uncategorized

अंकगणित & बुद्धिमत्ता टेस्ट 1

1 / 20

खालील पैकी विजोड पद ओळखा.

58, 97, 67, 94

2 / 20

एका सांकेतिक भाषेत KGLFT ला PTOUG असे लिहिले जाते. तर त्याच सांकेतिक भाषेत MERSA कसे लिहिले जाईल ?

3 / 20

200 मीटर लांबीच्या ट्रेनला 72 कि.मी. प्रति तास वेगाने 360 मीटर लांबीचा बोगदा पुर्णपणे ओलांडण्या करीता किती वेळ लागेल ?

4 / 20

राम आणि श्याम हॉकी व व्हॉलीबालमध्ये चांगले आहेत. सचिन व राम हॉकी आणि बेसबालमध्ये चांगले आहेत. गौरव आणि श्याम, व्हॉलीबाल व क्रिकेटमध्ये चांगले आहेत. सचिन, गौरव आणि सागर, बेसबाल व फुटबॉल मध्ये चांगले आहेत. तर बेसबाल, क्रिकेट, व्हॉलीबाल आणि फुटबॉल या सर्वांमध्ये चांगला कोण आहे ?

5 / 20

भारती आणि आनंद यांच्यामधील अंतर 180 कि.मी. आहे. ते एकमेकांच्या दिशेने अनुक्रमे ताशी 10 कि.मी. व ताशी 20 कि.मी. वेगाने धावू लागले, तर किती तासानंतर ते एकमेकास भेटतील ?

6 / 20

जर 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील ?

7 / 20

चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 27 असल्यास मोठी संख्या कोणती ?

8 / 20

तीन संख्याची सरासरी ही 60 आहे. दूसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी आहे परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे. तर दूसरी संख्या कोणती ?

9 / 20

सचिव, सेहवाग व धोनी यांनी मिळून 228 धावा केल्या. जर सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या असतील तर सचिनने किती धावा केल्या ?

10 / 20

1600 चे 60 टक्के हे क्ष च्या 80 टक्क्यांइतके आहेत तर क्ष ची किंमत किती ?

11 / 20

एका परीक्षेस 1200 मुले व 800 मुली बसले होते, त्यामध्ये 40% मुले आणि 48% मुली पास झाले. तर परीक्षेमध्ये किती टक्के विद्यार्थी नापास झाले ?

12 / 20

एक काम पूर्ण करायला कबीरला अक्षयपेक्षा 10 दिवस कमी लागतात. तर तेच काम करायला सत्यमला अक्षयपेक्षा 15 दिवस जास्त लागतात. जर कबीर आणि अक्षय दोघे मिळून हे काम 12 दिवसांत पूर्ण करत असतील तर अक्षय आणि सत्यमला हे काम पूर्ण करायला किती दिवस लागतील ?

13 / 20

एका स्त्रीचा परिचय करून देताना व्यक्ती म्हणते, ती तिच्या आई- वडिलांची एकुलती एक मुलगी आहे आणि तिच्या आईच्या नवऱ्याची बहिण माझी आत्या आहे. मला भाऊ वा बहिण नाही. जर ही व्यक्ती पुरुष असेल तर या स्त्रीशी त्याचे नाते काय आहे ?

14 / 20

नवऱ्याला आदित्यचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली, ‘त्याच्या भावाचे वडील हे माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे’ त्या स्त्रीचे आदित्यशी नाते काय ?

15 / 20

घोड्याला गाढव म्हटले, गाढवाला झेब्रा म्हटले, झेब्राला हत्ती म्हटले, हत्तीला वाघ म्हटले तर सोंड असणारा प्राणी कोणता असेल ?

16 / 20

एका शेतात काही मेंढ्या व काही मेंढपाळ आहेत मेंढ्या व मेंढपाळ यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे तर त्या ठिकाणी मेंढ्या व मेंढपाळ यांची प्रत्येकी संख्या किती ?

17 / 20

150 मीटर लांब असलेली रेल्वे एका खांबाला 5 सेकंदात मागे टाकते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती असेल ?

18 / 20

जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित सर्व बकऱ्या आहेत, त्या कळपात सर्व 34 गुरे असतील तर बकऱ्या किती ?

19 / 20

एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 30 टक्के जेवणावर, 15 टक्के कपड्यावर व 5 टक्के मनोरंजनावर खर्च करतो, तरीसुद्धा त्यांच्याकडे 2000 रुपये शिल्लक राहतात, तर त्याचा एकूण पगार किती ?

20 / 20

10 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होते. 10 वर्षांनंतर वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट होईल, तर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती ?

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment