WRD CutOff जाहिर
जलसंपदा विभागातील गट-ब (अराजपत्रित) व गट क सरळसेवा भरतीसाठी विविध १४ संवर्गाच्या परिक्षा घेणेत आलेल्या आहेत. सदर पदांसाठीची ऑनलाईन परीक्षा दिनांक २७.१२.२०२३, दिनांक २९.१२.२०२३, दिनांक ३१.१२.२०२३, दिनांक ०१.०१.२०२४ व दिनांक ०२.०१.२०२४ रोजी संपन्न झालेली आहे.
२. उमेदवारांची Markwise Merit List शासनाच्या https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक ०३.०३.२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
WRD कागदपत्रे तपासणीसाठी कोणती कागदपत्रे हवीत ? Click Here
WRD कागदपत्रे तपासणी (DV) संपूर्ण वेळापत्रक पहा Click Here
३. सर्व संवर्गाच्या (निम्न श्रेणी लघुलेखक पदाच्या वगळून) कागदपत्रे पडताळणीसाठी उमेदवारांची (List of Candidates for Document Verification) यादी शासनाच्या https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येत आहे. शासन पत्र क्र. संकीर्ण-११२४/प्र.क्र.१२६/आस्था (अतांत्रिक), दि. ०७/०६/२०२४ नुसार ठाणे परिमंडळ व नाशिक परिमंडळ वगळून कागदपत्रे पडताळणी यादी प्रसिध्द करणेत येत आहे.
४. सदर यादीमधील नमूद उमेदवारांना गुणवत्ता व नमूद आरक्षणानुसार प्राथमिक स्तरावर पात्र/अपात्रता अमजावणेसाठी केवळ कागदपत्रे तपासणीसाठी बोलाविण्यात येत आहे. उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी/तपासणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणानुसार उपलब्ध पदांनुसार सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. प्रनिम १२२२/ प्र.क्र. ५४/का १३ अ दि. ०४.०५,२०२२ नुसार अंतीम निवडसूची तयार करणेत येईल. कागपदत्र पडताळणी यादीमध्ये उमेदवारांचे नाव समाविष्ठ झाले असले म्हणजे अंतिम निवडसूची प्रतिक्षायादी मध्ये समाविष्ठ झाला असे नाही, याबाबतची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
५. दप्तर कारकुन / मोजणीदार / कालवा निरीक्षक यांची कागदपत्र पडताळणी यादी मा. महाराष्ट्र प्राशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद यांच्या याचिका क्र. ४८३/२०२४ तसेच सहाय्यक आरेखक यांची कागदपत्र पडताळणी यादी मा. उच्च न्यायालय, मुंबई रिट पिटीशन (एस. टी) नं. ९८२१/२०२४ यांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रसिध्द करणेत येत आहे.
६. उमेदवाराने ज्या परिमंडळासाठी अर्ज केलेला आहे, त्या परिमंडळाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी नमुद केलेल्या पत्त्यावर कागदपत्र पडताळणी होणार आहे तरी आपला कागदपत्र पडताळणी अनुक्रमांक (Sr No.) व आपणास कागदपत्र पडताळणीसाठीचे ठिकाण पाहून नमूद तारखेस व नमूद ठिकाणी उपस्थित राहण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी.
७. सदर उमेदवारांनी त्यांचे पदानुसार www.wrd.maharashtra.gov.in या वेबससाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली तपासणी सूची भरुन त्यांचे संबंधित मूळ कागदपत्रे व मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित २ प्रतीसह उपस्थित रहावयाचे आहे.
८. सदर पडताळणीस गैरहजर राहिलेल्या अथवा कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या उमेदवारांस कोणत्याही परिस्थितीत व कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, तसेच भविष्यात याबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही.
९. ज्या उमेदवारांने एका संवर्गापेक्षा अधिक संवर्गासाठी वेगवेगळ्या परिमंडळात अर्ज कलेला आहे व एकापेक्षा अधिका पर्दाच्या ‘कागदपत्र पडताळणी यादी मध्ये उमेदवाराचा समावेश असेल व कागदपत्र पडताळणीची दि. व वेळ एकच असल्यास अशा परिस्थितीत उमेदवाराने संबंधित परिमंडळांना E mail व्दारे दि. ११.०६.२०२४ पर्यंत कळवावे. पडताळणीसाठी नवीन दिनांक व वेळ उपलब्ध करून घेण्यात यावा.
पुणे All Post CutOff | Download CutOff PDF |
छ. संभाजीनगर All Post CutOff | Download CutOff PDF |
नागपूर All Post CutOff | Download CutOff PDF |
सातारा–कोल्हापूर All Post CutOff | Download CutOff PDF |
अमरावती All Post CutOff | Download CutOff PDF |