Skip to content
- सर्बियाचा स्टार खेळाडू नोव्हाक जोकोविचने ग्रीक खेळाडू ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपासचा पराभव करून विक्रमी10 वे ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर अनेक विक्रमांना गवसणी घातली,.
- गेल्या वर्षी कोविड लस वादामुळे नोव्हाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होऊ शकला नाही.
- पुरुष एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत नोव्हाक जोकोविचने ग्रीक खेळाडू स्टेफानोस त्सित्सिपासचा 6-3, 7-6, 7-6(7-5) असा सरळ सेटमध्ये पराभव केला. आणि विक्रमी 10 वे ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद मिळवले.
- या विजेतेपदासह नोव्हाक जोकोविचने सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या राफेल नदालची बरोबरी केली आहे. दोघांनीही आतापर्यंत प्रत्येकी 22-22 ग्रँडस्लॅम विजेतेपदे पटकावली. निवृत्त झालेला रॉजर फेडरर 20 ग्रँडस्लॅम विजेतेपदांसह 2 ऱ्या स्थानावर आहे.
- जोकोविचच्या 22 विजेतेपदांमध्ये 10 ऑस्ट्रेलियन ओपन, 2 फ्रेंच ओपन, 7 विम्बल्डन आणि 3 यूएस ओपन विजेतेपदांचा समावेश आहे.
- पुरुष एकेरीची सर्वाधिक ग्रॅंडस्लॅम जिंकणारे पुरुष खेळाडू :-
- 22- नोव्हाक जोकोविच
22 – राफेल नदाल
20 – रॉजर फेडरर
14 – पीट सॅंम्प्रास
- सर्वाधिक एकेरी विजेतेपद मिळवणारे महिला व पुरुष खेळाडू :-
- 24 – मार्गारेट कोर्ट (ऑस्ट्रेलिया)
23 – सेरेना विलियम्स (अमेरिका)
22 – स्टेफी ग्राफ (जर्मनी)
22 – नोव्हाक जोकोविच (सर्बिया)
22 – राफेल नदाल (स्पेन)
20 – रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड)
18 – ख्रिस इवर्ट (अमेरिका)
18 – मार्टिना नवरातिलोवा (अमेरिका)
14 – पीट सॅंम्प्रास (अमेरिका)
- 15 वर्षात दोन वेळा एखादी ग्रॅंडस्लॅम जिंकली स्पर्धा :-
- नोव्हाक जोकोविच जगातील दुसरा असा खेळाडू झाला आहे ज्याने 15 वर्षात दोन वेळा एखादी ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. जोकोविचने 2008 साली पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती. तर त्यानंतर 2023 मध्ये पुन्हा ही स्पर्धा जिंकली. यापुर्वी स्पेनच्या राफेल नदालने 2005 साली फ्रेंच ओपन जिंकली होती. त्यानंतर 2022 मध्ये फ्रेंच ओपन जिंकली.
- एकच स्पर्धेत सर्वाधिक वेळा जिंकणारे खेळाडू :-
- 14 – राफेल नदाल, फ्रेंच ओपन
10 – नोव्हाक जोकोविच, ऑस्ट्रेलियन ओपन
8 – रॉजर फेडरर, विंबल्डन
8 – पीट सॅंम्प्रास, विंबल्डन
7 – नोव्हाक जोकोविच, विंबल्डन