31 जानेवारी दिनविशेष | 31 January DinVishesh | 31 January Important Facts

31 जानेवारी – घटना

1911: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.

1920: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात.

1929: सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले.

1945: युद्धातुन पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला.

1949: बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.

1950: राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी संसदेपुढे पहिले भाषण केले.

1950: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांनी हायड्रोजन बॉम्ब बनवण्याच्या योजनेस मान्यता दिली.

31 जानेवारी – जन्म

1896: कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे तथा अंबिकातनयदत्त यांचा जन्म. (मृत्यू: 21 ऑक्टोबर 1981)

1931: गीतकार कवी व लेखक गंगाधर महांबरे यांचा जन्म. (मृत्यू: 23 डिसेंबर 2008)

1975: चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका प्रीती झिंटा यांचा जन्म.

31 जानेवारी – मृत्यू

1954: एफ. एम. रेडिओचे संशोधक ई. एच. आर्मस्ट्राँग यांचे निधन. (जन्म: 18 डिसेंबर 1890)

1969: आध्यात्मिक गुरू अवतार मेहेरबाबा यांचे निधन. (जन्म: 25 फेब्रुवारी 1894 – पुणे, महाराष्ट्र)

1972: नेपाळचे राजे महेन्द्र यांचे निधन.

1986: संगीतकार विश्वनाथ मोरे यांचे निधन.

1994: मराठी व हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांचे निधन.

1995: बँकिंग तज्ञ, रोखे बाजार नियामक मंडळाचे (SEBI) चे अध्यक्ष सुरेश शंकर नाडकर्णी यांचे निधन.

2000: नाटककार वसंत कानेटकर यांचे निधन. (जन्म: 20 मार्च 1920)

2000: हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक कृष्ण नारायण तथा के. एन. सिंग यांचे निधन. (जन्म: 1 सप्टेंबर 1908 – डेहराडून, उत्तराखंड)

2004: व्हायोलिनवादक व्ही. जी. जोग यांचे निधन. (जन्म: 22 फेब्रुवारी 1922)

2004: गायिका व अभिनेत्री सुरैय्या जमाल शेख ऊर्फ सुरैय्या यांचे निधन. (जन्म: 15 जून 1929)

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment