● ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे.
● अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले” अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
● अभिनेते अशोक सराफ यांना प्रेमाने सर्वजण ‘मामा’ अशी हाक मारतात.
● अशोक सराफ यांचा जन्म 1947 साली मुंबईत झाला.
● 1969 पासून ते सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. मराठीसोबतच त्यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्येही काम केलं.
● ‘जानकी’ या सिनेमातून त्यांनी अभिनयात पदार्पण केलं.
● यानंतर त्यांनी ‘आयत्या घरात घरोबा’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘भूताचा भाऊ’, ‘धुमधडाका’सह 300 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
● ‘पांडू हवालदार’ सिनेमातील ‘सखाराम हवालदार’ आणि ‘अशी ही बनवाबनवी या चित्रपटातील ‘धनंजय माने’ यांसह त्यांच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या मनात ठसल्या आहेत. अनेक वर्षे उलटूनही या भूमिकांची आणि चित्रपटांची जादू आजही कायम आहे.
● विनोदी अभिनेता म्हणून ते लोकप्रिय झाले. अशोक सराफ यांनी दादा कोंडके यांच्यासह सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे अशा दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे. सिनेमांशिवाय अशोक सराफ यांनी रंगभूमीही गाजवली.
● हिंदी सिनेसृष्टीतही अशोक सराफ यांनी अभिनयाचा डंका गाजवला. ‘सिंघम’ मधील त्यांची भूमिका विशेष गाजली. याशिवाय ‘गुप्त’, ‘कोयला’, ‘येस बॉस’, ‘करण अर्जुन’, ‘प्यार किया तो डरना क्या’ यांसारख्या हिंदी सिनेमात देखील त्यांनी भूमिका साकारल्या.
● हमीदाबाईची कोठी, अनधिकृत, ते सारखं छातीत दुखतय, व्हॅक्यूम क्लीनर अशा नाटकांमधून त्यांनी मराठी रंगभूमी गाजवली. मराठी चित्रपटांमधे पांडू हवालदार, अरे संसार संसार, एक डाव भूताचा, एक उनाड दिवस, वजीर, सुशीला, चौकट राजा, गुपचुप गुपचुप, भस्म, बहुरूपी, निशाणी डावा अंगठा अशा अनेक चित्रपटांमधे त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. हिंदीमधे दामाद, जोरु का गुलाम, करण-अर्जून, कोयला, सिंघम इत्यादी चित्रपटांमधे त्यांनी काम केले. हिंदीतल्या हम पांच, छोटी बडी बाते, डोन्ट वरी होजायेगा, तसेच मराठीतल्या टनटनाटन, नाना ओ नाना या त्यांच्या मालिका गाजल्या.
● ‘दगा’ चित्रपटात त्यांनी साकारलेल्या खलनायकाला स्त्रिया अक्षरशः शिव्या द्यायच्या. हेच त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेचे यश होते. त्यांनी अत्यंत टेरेफीक खलनायक साकारला होता. ‘अरे संसार संसार’ चित्रपटातील त्यांचा व्हिलनही सॉलिड होता, असे असूनही रसिकांनी त्यांच्यावर कॉमेडियनचा शिक्का मारला.
● पहिल्यांदाच अभिनेत्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
● 19 वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार
● गेल्या वर्षी अशोक सराफ यांनी वयाची पंच्याहत्तरी साजरी केली आणि कलाकार म्हणूनही त्यांनी अभिनयाचे अर्धशतक गाजवून आपली वाटचाल सुरू ठेवली आहे.
● मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार निवड समितीने यंदाच्या पुरस्कारासाठी अशोक सराफ यांची निवड केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समितीचे उपाध्यक्ष, तर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार सदस्य व डॉ. अनिल काकोडकर, डॉ. शशिकला वंजारी, वासुदेव कामत, अॅड. उज्वल निकम तसेच डॉ. जयंत नारळीकर अशासकीय सदस्य होते.
● महाराष्ट्र भूषण पुरस्कार बद्दल माहिती :-
● पुरस्काराची स्थापना : 1995
● पुढील क्षेत्रासाठी : आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा.
● पुरस्कार स्वरूप : 25 लाख रुपये आणि मानपत्र
● पहिला पुरस्कार : पू.ल.देशपांडे (साहित्य) 1996
● महिला: आतापर्यंत एकूण 4 महिलांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला आहे. यामध्ये लता मंगेशकर, सुमन कल्याणपूरकर, आशा भोसले.
➤2021 – आशा भोसले
➤2022 – अप्पासाहेब धर्माधिकारी
➤2023 – अशोक सराफ