28 जानेवारी दिनविशेष | 28 January DinVishesh | 28 January Important Facts28 जानेवारी – घटना

28 जानेवारी – घटना

1646: मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध.

1942: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला.

1961: एच. एम. टी. वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला.

1977: मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे 15 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

1986: चॅलेंजर या अवकाशयानाचा उड्डाणानंतर 74 सेकंदांनी स्फोट झाला.

2010: 1975 मधे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांची हत्या करणाऱ्या 5 जणांना फाशी देण्यात आले.

28 जानेवारी – जन्म

1457: इंग्लंडचा राजा हेन्‍री (सातवा) यांचा जन्म. (मृत्यू: 21 एप्रिल 1509)

1865: स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म. (मृत्यू: 17 नोव्हेंबर 1928)

1899: स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचा जन्म. (मृत्यू: 15 मे 1993)

1925: शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे 4 थे अध्यक्ष डॉ. राजा रामण्णा यांचा जन्म. (मृत्यू: 23 सप्टेंबर 2004)

1930: मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक पं. जसराज यांचा जन्म.

1937: चित्रपट व भावगीत गायिका सुमन शंकर हेमाडी तथा सुमन कल्याणपूर यांचा जन्म.

1955: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष निकोलस सारकोझी यांचा जन्म.

28 जानेवारी – मृत्यू

1547: इंग्लंडचा राजा हेन्‍री (आठवा) यांचे निधन. (जन्म: 28 जून 1491)

1616: संत दासोपंत समाधिस्थ झाले. (जन्म: 24 सप्टेंबर 1551)

1851: बाजीराव पेशवे (दुसरे) यांचे कानपूरजवळ ब्रम्हावर्त येथे निधन झाले. (जन्म: 10 जानेवारी 1775)

1984: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते सोहराब मेहेरबानजी मोदी यांचे निधन. (जन्म: 2 नोव्हेंबर 1897)

1996: अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ बर्न होगार्थ यांचे निधन. (जन्म: 25 डिसेंबर 1911 – शिकागो, इलिनॉय, यू. एस. ए.)

1997: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे यांचे निधन. (जन्म: 27 जुलै 1911)

2007: संगीतकार ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर यांचे निधन. (जन्म: 16 जानेवारी 1926)

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment