14 जानेवारी चालू घडामोडी नोट्स || 14 January Current Affairs Notes

■ किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका  डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन
● स्वरयोगिनी, संगीत विचारवंत , लेखिका अशी बहुआयामी ओळख असलेल्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे आज निधन झाले.
● त्यांच्या निधनाने एक स्वरतपस्वी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.
● पं. सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या होत्या.
● केंद्र सरकारने त्यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल 1990 मध्ये पद्मश्री,
● 2002 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
● 2022 मध्ये पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
● शास्त्रीय संगीत परंपरेच्या त्या महत्वाच्या दुवा होत्या.
● संगीताचा ध्यास घेऊन त्यासाठी जीवन अर्पण करणाऱ्या डॉ. प्रभा अत्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपद.
● मलेशिया खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत आज झालेल्या पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
● भारताच्या या जोडीला चीनच्या वँग चँग आणि लियांग वेईकेंग यांनी 21-9, 18-21, 17-21 अशा 3 सेटमध्ये पराभूत केले.
● दरम्यान, नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडिअमवर मंगळवारपासून सुरू होणाऱ्या इंडिया ओपन सुपर 750 क्राऊन स्पर्धेत सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी सहभागी होणार आहेत. 

कवी मूनव्वर राणा यांचे निधन
● उर्दूतले प्रख्यात कवी मूनव्वर राणा यांचे काल लखनौच्या एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
● राणा यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1952 मध्ये उत्तर प्रदेशातल्या रायबरेली येथे झाला.
● उर्दू साहित्य आणि कवितेच्या प्रांतात त्यांनी मुशाफिरी केली होती. गझल ही त्यांची विशेष ओळख होती. पारंपरिक गझल प्रकारातली मां ही त्यांची गझल विशेष गाजली.
● 2014 मध्ये त्यांना शाहदाबा या कवितेच्या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आले होते.
● त्याशिवाय मीर खुसरो पुरस्कार, मीर तकी मीर पुरस्कार, गालिब पुरस्कार, डॉ झाकीर हुसेन पुरस्कार आणि सरस्वती समाज पुरस्कार या नामांकित पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते.

इंडोनेशियामधल्या सुमात्रा बेटावर असणाऱ्या माऊंट मारापी ज्वालामुखीचा उद्रेक
● इंडोनेशियामधल्या सुमात्रा बेटावर असणाऱ्या माऊंट मारापी ज्वालामुखीचा आज सकाळी पुन्हा उद्रेक झाला.
● या ज्वालामुखीची राख आजूबाजूच्या गावात पासरल्यानं, तिकडच्या 150 पेक्षा जास्त नागरिकांना  स्थलांतर करावे लागले.
● गेल्यावर्षीच्या डिसेंबरमध्येही माऊंट मारापी ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. मारापी हा सुमात्रामधला सर्वात सक्रिय ज्वालामुखी आहे. 
● दरम्यान नैऋत्य आइसलँडमध्येही  ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून, 2021 पासून  रेकजेनेस द्वीपकल्पात झालेला हा 5 वा उद्रेक आहे. लावा कुठून बाहेर पडत होता किंवा कोणत्या दिशेने वाहत होता हे अद्याप अस्पष्ट असल्याचं आइसलँड हवामान विभागाने म्हटलं आहे. 

“मोदी: एनर्जीझिंग अ ग्रीन फ्यूचर” या पुस्तकाचे प्रकाशन
● केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे नेतृत्व करत, “मोदी: एनर्जीझिंग अ ग्रीन फ्यूचर” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
● डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी रिसर्च फाऊंडेशनच्या सहकार्याने पेंटागॉन प्रेसने प्रकाशित केलेले, हे पुस्तक शाश्वत भविष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनचे अन्वेषण करते.
● आरके पचनंदा आणि बिबेक देबरॉय सारख्या उल्लेखनीय व्यक्तींनी संपादित केलेले, हे भारताच्या पर्यावरणीय धोरणांचे सर्वसमावेशक विश्लेषण देते, जे पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण चळवळीत राष्ट्राचे नेतृत्व दर्शवते.

मूल्य प्रवाह 2.0
● भारतातील विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) मूल्य प्रवाह 2.0 मार्गदर्शक तत्त्वांद्वारे उच्च शिक्षणातील मूल्ये आणि नैतिकतेचा प्रचार करत आहे.
● मानवी मूल्ये आणि व्यावसायिक नैतिकता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने, ते मूल्य-आधारित संस्था तयार करते, पारदर्शकता, सचोटी आणि उत्तरदायित्व यावर जोर देते.
● मार्गदर्शक तत्त्वे मूलभूत कर्तव्ये आणि संवैधानिक मूल्यांचा खोल आदर करण्यावर भर देतात, संस्थांना पारदर्शकता, निष्पक्षता आणि सर्वोच्च नैतिक मानकांना प्राधान्य देण्यास उद्युक्त करतात.
● शिक्षकांनी आदर्श असणे अपेक्षित आहे, आणि भागधारक संघटनांना विकास उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
● मूल्य प्रवाह 2.0 ही 2019 च्या मार्गदर्शक तत्त्वाची सुधारित आवृत्ती आहे ज्यामध्ये संवैधानिक मूल्यांचा प्रचार करण्यावर भर आहे.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment