10 जानेवारी – घटना
1666: सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले.
1730: पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.
1806: केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.
1810: नेपोलियन बोनापार्ट यांनी जोसेफाइन या त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला.
1863: चार्ल्स पिअर्सन यांच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या 7 किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.
1870: मुंबई मधील चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले.
1870: जॉन डी. रॉकफेलर यांनी स्टँडर्ड ऑईल कंपनीची स्थापना केली.
1920: पहिले महायुद्ध – व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.
1926: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
1929: जगात अमाप लोकप्रियता मिळालेले द अॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिन हे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले.
1966: भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.
1972: पाकिस्तान मधील तुरुंगात 9 महिने काढल्यानंतर शेख मुजीबूर रहमान हे राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या बांगला देश मधे परतले.
10 जानेवारी – जन्म
1775: बाजीराव पेशवे (दुसरे) यांचा जन्म. (मृत्यू: 28 जानेवारी 1851 – ब्रम्हावर्त)
1896: वास्तुसंग्राहक दिनकर गंगाधर केळकर यांचा जन्म. (मृत्यू: 12 जानेवारी 1966)
1900: महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव सांबशिव कन्नमवार यांचा जन्म. (मृत्यू: 24 नोव्हेंबर 1963)
1901: इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचा पनवेल येथे जन्म.
1919: संस्कुत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर, महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथांचे लेखक श्री. र. भिडे यांचा जन्म.
1927: तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन यांचा जन्म.
1940: पार्श्वगायक व संगीतकार के. जे. येसूदास यांचा जन्म.
1950: आदिवासींसाठी आयुष्य वेचणाऱ्या नाजुबाई गावित यांचा जन्म.
1974: हिंदी चित्रपट अभिनेते ह्रितिक रोषन यांचा जन्म.
10 जानेवारी – मृत्यू
1760: पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर दत्ताजी शिंदे यांचे निधन.
1778: स्वीडीश वनस्पतीशास्त्रज्ञ कार्ल लिनिअस यांचे निधन. (जन्म: 23 मे 1707)
1999: स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर यांचे निधन.
2002: ख्यालगायक, गुरु व बंदिशकार पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास यांचे निधन. (जन्म: 9 नोव्हेंबर 1924)