5 जानेवारी – घटना
● 1664 : छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या सीमेवर पोहोचले. त्यांनी सुरतेचा सुभेदार इनायत खान याला खंडणी देण्यासाठी निरोप पाठविला.
● 1671 : छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांकडून साल्हेर काबीज केले.
● 1832 : दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित.
● 1919 : द जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना. या पार्टीचे पुढे नाझी पार्टीत रुपांतर झाले.
● 1924 : महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्य लोकांसाठी खुले केले.
● 1933 : सॅन फ्रान्सिस्को येथील गोल्डन गेट ब्रिजच्या बांधकामाला सुरूवात झाली.
● 1948 : वॉर्नर ब्रदर्स यांनी रोझ बाऊल फुटबॉल स्पर्धेच्या जगातील पहिल्या रंगीत सिनेमाचे प्रदर्शन केले.
● 1949 : पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.
● 1957 : विक्रीकर कायदा सुरू झाला.
● 1974 : अंटार्क्टिकामधील सर्वोच्च तापमानाची (15ºC) नोंद झाली.
● 1997 : रशियाने चेचेन्यातुन सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.
● 1998 : ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
● 2004 : संभाजी ब्रिगेड या जातीयवादी संघटनेने केलेल्या समाजकंटकांच्या हल्ल्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्युटचे अतोनात नुकसान. अनेक अमोल व दुर्मिळ ग्रंथ फाडले.
5 जानेवारी – जन्म
● 1592 : 5 वा मुघल सम्राट शहाजहान यांचा जन्म. (मृत्यू: 22 जानेवारी 1666)
● 1868 : मराठी संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू यांचा जन्म.
● 1892 : लेखक व मराठी भाषातज्ञ कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: 12 जून 1964 – मुंबई)
● 1913 : मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: 24 मार्च 2007)
● 1922 : आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते मोहम्मद उमर मुक्री यांचा जन्म. (मृत्यू: 4 सप्टेंबर 2000)
● 1928 : मराठी साहित्यिक विजय तेंडूलकर यांचा जन्म.
● 1941 : भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे 9 वे व शेवटचे नबाब मन्सूर अली खान पतौडी यांचा जन्म. (मृत्यू: 22 सप्टेंबर 2011)
● 1948 : भारतीय क्रिकेटपटू पार्थसारथी शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: 20 ऑक्टोबर 2010)
● 1948 : अभिनेत्री आणि गायिका फय्याज यांचा जन्म.
● 1955 : पश्चिम बंगालच्या ८ व्या व पहिल्याच महिला मुख्यमंत्री आणि तृणमूल पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा जन्म.
● 1986 : हिंदी चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा जन्म.
5 जानेवारी – मृत्यू
● 1947 : कर्नाटक संगीताचे रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ आणि गायक त्यागराज यांचे निधन.
● 1933 : अमेरिकेचे 30 वे राष्ट्राध्यक्ष काल्व्हिन कूलिज यांचे निधन. (जन्म: 4 जुलै 1872)
● 1943 : अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे निधन. (जन्म: 1 फेब्रुवारी 1864)
● 1971 : भारतीय जादुगार पी. सी. सरकार यांचे निधन.
● 1982 : भारतीय संगीतकार रामचंद्र चितळकर उर्फ सी. रामचंद्र यांचे निधन. (जन्म: 12 जानेवारी 1918)
● 1990 : चित्रपट निर्माते व दिग्दर्शक रमेश बहल यांचे निधन.
● 1992 : इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे यांचे निधन. (जन्म: 3 जुलै 1914)
● 2003 : पखवाजवादक गोपालदास पानसे यांचे निधन.