1 जानेवारी चालू घडामोडी नोट्स
■ रजनीश शेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) च्या अध्यक्षपदी निवड
● राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली. 1 जानेवारी रोजी कोकण भवन येथील MPSC च्या कार्यालयात त्यांनी पदभार स्वीकारला.
● हा अतिरिक्त पदभार सदस्य आणि माजी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे होता.
● महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये अध्यक्षांसह 5 सदस्य असतात. या सदस्यांमध्ये दिलीप पांढरपट्टे, डॉ. अभय वाघ, डॉ. संतोष देशपांडे आणि डॉ. देवानंद शिंदे यांचा समावेश आहे.
● तत्कालीन अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर 19 सप्टेंबर 2023 रोजी निवृत्त झाले. त्यानंतर अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार सदस्य पांढरपट्टे यांच्याकडे होता.
■ मंगळभूमीवर रोव्हर चालवणारी पहिली भारतीय व्यक्ती डॉ. अक्षता कृष्णमूर्ती
● कल्पना चावला, सुनीता विल्यम्स या अंतराळवीरांगनांनंतर आता ‘नासा’च्या माध्यमातून एका भारतीय तरुणीने मोठी कामगिरी करून दाखवली आहे. या तरुणीचे नाव आहे डॉ. अक्षता कृष्णमूर्ती.
◆ अक्षता ही मंगळ ग्रहावर रोव्हर चालवणारी पहिली भारतीय व्यक्ती ठरली आहे. तिच्या या कामगिरीने अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास रचला गेला आहे.
● पृथ्वीवरून मंगळावरील हे रोव्हर नियंत्रित करण्याचे कौशल्य तिने दाखवले.
■ राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर
● राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची आज नियुक्ती करण्यात आली.
● सरत्या 2023 या वर्षाच्या शेवटच्या दिवशी डॉ. करीर यांच्या नावावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले अन् लगेचच मुंबईत मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून डॉ. करीर यांनी पदाची सूत्रे स्वीकारली.
● वित्त विभागाच्या सचिवपदी कार्यरत असलेल्या करीर यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण केली.
● महाराष्ट्राच्या केडरमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. मूळ अहमदनगरचे असलेल्या डॉ. करीर यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले अन् स्वतःची छापही उमटवली.
■ ‘एक्सपोसॅट’ चे यशस्वीचे प्रक्षेपण
● इस्रोने सोमवारी वैज्ञानिक प्रयोगांसाठी ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाचा (PSLV) चौथा टप्पा दोनदा यशस्वीरीत्या पार पाडला.
● सोमवारी (1 जानेवारी) सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी 44.4 मीटर लांबीच्या PSLV C 58 या प्रक्षेपकाच्या साहाय्याने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून एक्सपोसॅटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
● एक्सपोसॅट म्हणजेच एक्स रे पोलॅरीमीटर सॅटेलाईट
● त्यानंतर 21 मिनिटांनी प्रमुख उपग्रह ‘एक्सपोसॅट’ 650 किलोमीटर अंतरावरील पृथ्वीच्या निम्न कक्षेत प्रस्थापित केला.
कृष्णविवरे, न्यूट्रॉन तारे, पल्सार आदी ‘क्ष-किरण’ स्रोतांच्या अभ्यासाचे लक्ष्य
● मोहिमेचे आयुष्य सुमारे पाच वर्षे अपेक्षित
● बेंगळुरू येथील रामन रिसर्च इन्स्टिट्यूटने (RRI) तयार केलेल्या पोलॅरिमीटर इन्स्ट्रुमेंट इन एक्स-रे (पोलिक्स) आणि यू. आर. राव सॅटेलाइट सेंटरने तयार केलेल्या एक्सरे स्पेक्ट्रोस्कोपी अँड टायमिंग (एक्सपेक्ट) या 2 वैज्ञानिक उपकरणांचा ‘एक्स्पोसॅट’ मध्ये समावेश आहे.
● शास्त्रीय निरीक्षणे आणि माहिती संकलनासाठी नवा मार्ग खुला होणार
● प्रकाशाचे ध्रुवीकरण मोजणी करण्यासाठी उपग्रहाचा वापर
● ‘एक्स्पेक्ट’ची निर्मिती बंगळूरमधील यूआर राव सॅटेलाइट सेंटर’ कडून
● क्ष-किरण स्पेक्ट्रोस्कोपी आणि वेळ यावर उपग्रहाचे लक्ष
● बंगळूरमधील बेलाट्रिक्स एरोस्पेस या स्टार्टअप्सद्वारे ‘रुद्रा 0.3 एसपीजीपी’, ‘ग्रीन मोनोप्रोपेलंट थ्रस्टर’ आणि ‘एआरकेए-200’, हॉल थ्रस्टरसाठी ‘हीटर-लेस होलो कॅथोड’ या उपकरणांची चाचणी होणार
■ राज्यातील 100 महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रे
● 15 ते 45 वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनविण्यासाठी कौशल्य विकास सोसायटीतर्फे ‘प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियाना’ची अंमलबजावणी केली जाणार आहे.
● याद्वारे महाराष्ट्रातील 100 महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जाणार आहेत, अशी घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी केली.
■ कोरेगाव भीमा येथे शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन
● पुणे-नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा येथे शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी 1 जानेवारी रोजी राज्यभरातून हजारो अनुयायी दाखल झाले होते.
● ब्रिटिश सैन्यातील सैनिकांनी पेशव्यांच्या सैन्यावर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दर वर्षी 1 जानेवारीला येथे शौर्यदिन (206 वा) साजरा केला जातो.
● 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृत्वाखाली फक्त 500 सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या 25,000 सैन्याचा पराभव केला.
■ हिंगणघाटात राज्यातील पहिले ‘स्मार्ट कॅफे टॉयलेट’
● केंद्र व राज्य शासनाकडून दखल; व्यवस्थापन बचत गटाच्या महिलांकडे राज्यातील अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून, केवळ १० लाख रुपये खर्चुन बांधण्यात आलेल्या या टॉयलेटची दखल केंद्र व राज्य शासनाने घेतली आहे.
● दुहेरी उद्देशाने आणि अतिशय सुंदरपणे बांधलेल्या या टॉयलेटचे सर्वत्र कौतुक होत आहे.
● ‘स्वच्छ आणि सुंदर शहर’ या संकल्पनेला अनुसरून राज्यात प्रथमच स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक अशा स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती नगर परिषदेद्वारे करण्यात आली