28 नोव्हेंबर : चालू घडामोडी वनलायनर नोट्स
● बुकर पुरस्कार 2023 जाहीर
आयरिश लेखक पॉल लिंच यांना प्रॉफेट सॉंग” या कादंबरीसाठी प्रतिष्ठित ‘बुकर’ पुरस्कार 2023 जाहीर. 50,000 पौड पुरस्कार रकमेचा हा पुरस्कार 1969 सालापासून देण्यात येतो. हा पुरस्कार इंग्रजी मध्ये प्रकाशित झालेल्या कोणत्याही देशाच्या नागरिकास देण्यात येतो.
● मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून ज्येष्ठ वकील सोमशेखर सुंदरेशन यांचा शपथविधी
मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून ज्येष्ठ वकील सोमशेखर सुंदरेशन यांचा शपथविधी आज झाला. मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डी.के. उपाध्याय यांनी त्यांना पदाची शपथ दिली. या नियुक्तीबरोबर मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या आता 69 झाली आहे. न्यायालयात एकंदर 94 न्यायाधीशांची पदं मंजूर आहेत.
● भारताचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड यांनी ‘FASTER 2.0’ पोर्टल केले लाँच
हे पोर्टल तुरुंग अधिकाऱ्यांना कैद्यांची सुटका करण्याच्या न्यायालयीन आदेशांबद्दल त्वरित माहिती देईल. पोर्टलमध्ये, एखाद्या व्यक्तीच्या सुटकेचे न्यायालयीन आदेश त्वरित पालन करण्यासाठी तुरुंग, ट्रायल कोर्ट आणि उच्च न्यायालयांमध्ये हस्तांतरित केले जातात. ‘FASTER 2.0’ हे पोर्टल लाइव्ह आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ माहिती देण्यास अनुमती देते.
● पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने मुखमंत्री तीर्थ यात्रा योजना सुरू केली.
● आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (ILO) “Promises and reality 2019-2023 Report” या अहवालात म्हटले आहे की, कामाशी संबंधित अपघात आणि आजारांमुळे जगभरात दरवर्षी सुमारे 30 लाख कामगारांचा मृत्यू होतो. हा अहवाल केंद्राला भारतातील असमानता, भ्रष्टाचाराचे निराकरण करण्याचे आवाहन करतो.
● बॉस ख्रिस्तोफर लक्सन यांनी घेतली न्यूझीलंडचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ.
माजी एअरलाइन बॉस ख्रिस्तोफर लक्सन यांनी सोमवारी (27 नोव्हेंबर रोजी) न्यूझीलंडचे पंतप्रधान म्हणून औपचारिकपणे न्यूझीलंडचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या नवीन उजव्या-केंद्रातील सरकारसह शपथ घेतली, उदारमतवादी सरकारांच्या युगाचा अंत झाला.
● S&P ग्लोबल रेटिंग्सने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा वाढीचा अंदाज 6% वरून 6.4% पर्यंत वाढवला आहे.
● इटलीने पटकावले डेव्हिस कप विजेतेपद
इटलीने जवळपास 5 दशकानंतर डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. इटलीचा प्रमुख खेळाडू जॅनिक सिन्नेरने सलग 5व्या विजयाची नोंद करतअंतिम फेरीच्या दुसऱ्या एकेरी लढतीत अॅलेक्स डी मिनौरचा 6-3, 6-0 असा पराभव करून ऑस्ट्रेलियावर 2-0 असा विजय मिळवला. इटलीने 1976 नंतर प्रथमच डेव्हिस कप जिंकला आहे. उपांत्य फेरीत सिन्नेरने लागोपाठ दोन लढतीत सर्बियाच्या अग्रमानांकित नोव्हाक जोकोविचवर विजय मिळवला होता.
● चेन्नई येथे 13व्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिपच्या विजेतेपदासाठी हरियाणा आणि पंजाब एकमेकांशी भिडतील.
गोव्यात आयोजित 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप
गोव्यात आयोजित 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप आज झाला. चित्रपट क्षेत्रातले अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. यावर्षी पहिल्यांदाच दिला गेलेला सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार पंचायत भाग 2 ला, तर विशेष परीक्षक पुरस्कार रिषभ शेट्टी यांना कंतारा या चित्रपटासाठी मिळाला. एन्डलेस बॉर्डर या पर्शियन चित्रपटाला सुवर्ण मयूर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. हॉलिवूडमधले ज्येष्ठ अभिनेते मायकेल डग्लस यांचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. बल्गेरियन दिग्दर्शक स्टीफन कोमण्डरेव्ह यांना त्यांच्या ब्लागाज लेसन्स या चित्रपटासाठी रजत मयूर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. उत्कृष्ट अभिनेत्याचा रजत मयूर पुरस्कार एन्डलेस बॉर्डर या चित्रपटातील अभिनयासाठी पौरिया रहिमी सॅम यांना तर, उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मेलॅनी थियरी यांना त्यांच्या पार्टी ऑफ फूल्स या चित्रपटातील अभिनयासाठी देण्यात आला. सर्वोत्कृष्ट चित्रपट पदार्पण पुरस्कार रेजर आझाद काया यांना व्हेन द सीडलिंग्स ग्रो या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी देण्यात आला. तर आयसीएफटी युनेस्को गांधी पदक ड्रिफ्ट या चित्रपटाला प्रदान करण्यात आला.
● 42 व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचा समारोप
नवी दिल्लीत गेले 14 दिवस सुरू असलेल्या 42 व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचा काल समारोप झाला. या मेळाव्यात 10 लाखांहून अधिक देशी-परदेशी पर्यटक आणि व्यावसायिकांनी भाग घेतला. वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेवर आधारित या मेळाव्यात बिहार आणि केरळ भागीदार राज्यं होती, तर दिल्ली, जम्मू-काश्मीर, झारखंड, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश केंद्रित राज्यं होती. स्थानिक हस्तकला कारागिरांच्या उत्पादनांसह ओमान, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि तुर्कस्तानसह तेरा देशांची वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनं येथे खरेदीसाठी उपलब्ध होती.