9 जानेवारी – घटना
1760: बरारीघाटच्या लढाईत अहमद शाह दुर्रानी यांनी मराठ्यांचा पराभव केला.
1788: कनेक्टिकट हे अमेरिकेचे 5वे राज्य बनले.
1880: क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि त्यांना तेहरान जहाजाने एडनला नेण्यात आले.
1915: महात्मा गांधी अफ्रिकेतुन भारतात आले.
2001: नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.
2001: नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.
2002: भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड विरूद्ध एकदिवसीय मालिका जिंकली.
2002: महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल 9 जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे योजण्यात आले.
2007: स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला.
9 जानेवारी – जन्म
1913: अमेरिकेचे 37वे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा जन्म. (मृत्यू: 22 एप्रिल 1994)
1918: मार्क्सवादी विचारवंत लेखक प्रभाकर उर्ध्वरेषे यांचा जन्म.
1922: जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते हर गोबिंद खुराना यांचा जन्म. (मृत्यू: 9 नोव्हेंबर 2011)
1926: चित्रपट अभिनेते कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार यांचा जन्म. (मृत्यू: 20 सप्टेंबर 1997 – मुंबई)
1927: सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक आणि समीक्षक रा. भा. पाटणकर यांचा जन्म.
1934: पार्श्वगायक महेंद्र कपूर यांचा जन्म. (मृत्यू: 27 सप्टेंबर 2008 – मुंबई)
1938: गणिती चक्रवर्ती रामानुजम यांचा जन्म. (मृत्यू: 27 ऑक्टोबर 1974)
1951: ख्यालगायक व पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य पं. सत्यशील देशपांडे यांचा जन्म.
1965: नृत्यदिग्दर्शक फराह खान यांचा जन्म.
9 जानेवारी – मृत्यू
1848: जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ कॅरोलिन हर्षेल यांचे निधन. (जन्म: 16 मार्च 1750)
1873: फ्रांसचे पहिले अध्यक्ष लुई-नेपोलियन बोनापार्ट उर्फ नेपोलियन 3रा यांचे निधन. (जन्म: 20 एप्रिल 1808)
1923: पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर यांचे निधन. (जन्म: 1 जून 1842)
2004: पखवाज वादक शंकरबापू आपेगावकर यांचे निधन.
2013: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ जेम्स बुकॅनन यांचे निधन. (जन्म: 3 ऑक्टोबर 1999)