7 मार्च चालू घडामोडी नोट्स
नवी दिल्ली येथे ‘रिपब्लिक शिखर परिषद 2024′ आयोजित.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे ‘रिपब्लिक शिखर परिषद 2024 ला संबोधित केले. या शिखर परिषदेची संकल्पना ‘भारत : आगामी दशक’ अशी होती. पंतप्रधानांनी परिषदेच्या संकल्पनेनुसार ‘आगामी दशकातील भारत’ यावर चर्चा घडवून आणल्याबद्दल रिपब्लिक चमूच्या दृष्टीकोनाचे कौतुक केले. सध्याचे दशक हे विकसित भारताचे संकल्प पूर्ण करण्याचे एक माध्यम बनेल, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 मध्ये हरियाणाच्या यतीन भास्कर दुग्गल याने पटकावला प्रथम क्रमांक
राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 मध्ये हरियाणाच्या यतीन भास्कर दुग्गल यानं प्रथम क्रमांक पटकावला. तमिळनाडूच्या वैषा पिचाई यांनी दुसऱ्या, तर राजस्थानच्या कनिष्का शर्मा यांनी तिसऱ्या क्रमांकावर आपलं नाव कोरलं. राज्य पातळीवरचे एकंदर 87 विजेते या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नवी दिल्लीत एकत्र जमले होते.
टपाल विभागाने पीएम सूर्य घर योजनेच्या अंमलबजावणीला केली सुरुवात
टपाल विभागाने पीएम सूर्य घर योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात केली असून विनामूल्य वीज योजनेसाठी नोंदणी मोहीम सुरू केली आहे या उपक्रमात छतावर सौर पॅनेल बसवण्याकरता एक कोटी कुटुंबांना अनुदान मिळणार असून त्यामुळे दरमहा 300 युनिटपर्यंत वीज मोफत मिळू शकेल. घरोघरी टपालवाटपासाठी जाणारे पोस्टमन नोंदणीसाठी मदत करतील, असं टपाल विभागानं जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडी
स्विडनचा अधिकृतरीत्या नाटोमध्ये प्रवेश
स्विडननं काल अधिकृतरीत्या नाटोमध्ये प्रवेश केला. या संघटनेचा स्विडन हा 32 वा सदस्य आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात फेब्रुवारी 2022 पासून सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्विडनने जवळपास दोन वर्षांपूर्वी नाटोत सहभागी होण्यासाठी अर्ज केला होता. काल ही प्रक्रिया पूर्ण झाली.
लष्कर ए तोयबा संघटनेचा सदस्य मोहम्मद कासीम गुज्जर दहशतवादी म्हणून घोषित
लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य मोहम्मद कासीम गुज्जर याला आज गृह मंत्रालयानं 1967 च्या बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यानुसार दहशतवादी म्हणून घोषित केले. सध्या तो पाकव्याप्त काश्मीरमधे आहे. शस्त्रास्त्र, दारूगोळा, स्फोट करणारी अद्ययावत उपकरणं यांचा वापर करणाऱ्या ड्रोन्ससाठी तो अचूक जागा टिपतो. तसंच तो सीमेपलीकडून भारतात अतिरेकी कारवायांसाठी लागणारा माल रवाना करत असल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे.
संरक्षण घडामोडी
ॲडमिरल आर हरिकुमार यांच्या उपस्थितीत भारतीय नौदल जहाज, जटायूचं जलावतरण
लक्षद्वीप बेटाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं भारतीय नौदलानं मिनिकॉय इथं आयोजित एका कार्यक्रमात ॲडमिरल आर हरिकुमार यांच्या उपस्थितीत भारतीय नौदल जहाज, जटायूचं जलावतरण केलं. हे. कावरत्ती इथल्या आयएनएस द्विपरक्षक नंतर लक्षद्वीपमधला हा दुसरा नौदल तळ आहे. या तळामुळे अरबी समुद्रात चाचेगिरी आणि अंमली पदार्थ विरोधी मोहिमेसाठी नौदलाला त्याची मदत मिळेल आणि दळणवळणाच्या दृष्टीनंही ते महत्त्वाचं आहे, असं यावेळी हरी कुमार म्हणाले.
आंतरराष्ट्रीय घडामोडी
स्विडनचा अधिकृतरीत्या नाटोमध्ये प्रवेश
स्विडननं काल अधिकृतरीत्या नाटोमध्ये प्रवेश केला. या संघटनेचा स्विडन हा 32 वा सदस्य आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात फेब्रुवारी 2022 पासून सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्विडनने जवळपास दोन वर्षांपूर्वी नाटोत सहभागी होण्यासाठी अर्ज केला होता. काल ही प्रक्रिया पूर्ण झाली.
लष्कर ए तोयबा संघटनेचा सदस्य मोहम्मद कासीम गुज्जर दहशतवादी म्हणून घोषित
लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य मोहम्मद कासीम गुज्जर याला आज गृह मंत्रालयानं 1967 च्या बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यानुसार दहशतवादी म्हणून घोषित केले. सध्या तो पाकव्याप्त काश्मीरमधे आहे. शस्त्रास्त्र, दारूगोळा, स्फोट करणारी अद्ययावत उपकरणं यांचा वापर करणाऱ्या ड्रोन्ससाठी तो अचूक जागा टिपतो. तसंच तो सीमेपलीकडून भारतात अतिरेकी कारवायांसाठी लागणारा माल रवाना करत असल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे.
क्रिडा घडामोडी
खेलो इंडिया स्पर्धेत पदकं जिंकणाऱ्यांना आता सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थान
खेलो इंडिया स्पर्धेत पदकं जिंकणाऱ्यांना आता सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थान मिळणार आहे. कर्मचारी आणि प्रशिक्षण विभाग आणि क्रीडा मंत्रालयानं या नोकऱ्यांसाठीच्या पात्रता निकषांमध्ये या दृष्टीनं बदल केले आहेत. खेलो इंडिया स्पर्धांसह विद्यापीठीय क्रीडा स्पर्धा, पॅरालिम्पिक, तसंच हिवाळी स्पर्धांमधल्या पदकविजेत्या क्रीडापटूंनाही सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करता येणार असल्याची माहिती केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना दिली.