7 एप्रिल : जागतिक आरोग्य दिन

7 एप्रिललाच जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो ?

जागतिक आरोग्यविषयक समस्यांविषयी विशेष कार्य करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी करण्यात आली त्यामुळे दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.

कधी पासून जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो ?

जागतिक आरोग्य संघटनेद्वारे घोषित केल्यानुसार पहिला जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल 1950 रोजी साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) बद्दल

जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली असून. यावर्षी आज 7 एप्रिल 2023 रोजी 75 वा वर्धापनदिन म्हणजेच स्थापना दिन साजरा करत आहे. WHO चे मुख्यालय जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे. सध्या WHO चे 194 सदस्य राष्ट्र आहेत.

कधीपासून संकल्पनानिहाय जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो ?

जगभरातील आरोग्य विषयक समस्यांबाबत निराकरण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO मार्फत दरवर्षी कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यासाठी प्रत्येक वर्षी एक संकल्पना (Theme) निवडली जाते. 1991 सालापासून एका संकल्पनेनुसार जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. 1995 मध्ये जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना जागतिक पोलिओ निर्मूलन ही होती. तेव्हापासून बऱ्याच देशांनी या आजाराच्या निर्मूलनाबाबत चांगले प्रयत्न केले. आजपर्यंत बहुतेक देशांनी पोलिओ आजाराचे निर्मूलन केले आहे.

2023 जागतिक आरोग्य दिन संकल्पना काय आहे ?

सर्वांसाठी आरोग्य (Health For All) ही 2023 सालच्या जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना आहे.
मागच्या वर्षीची 2022 ची जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना आपला ग्रह आपले आरोग्य (Our Planet, Our Health) ही होती.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

1 thought on “7 एप्रिल : जागतिक आरोग्य दिन”

Leave a Comment