5 फेब्रुवारी दिनविशेष | 5 February DinVishesh | 5 February Important Facts

5 फेब्रुवारी – घटना

1294: अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला सर केला आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला.

1766: माधवराव पेशवे आणि हैदराबदचा निजाम यांची कुरुमखेड येथे भेट.

1919: चार्ली चॅप्लिनने इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली.

1922: रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.

1945: दुसरे महायुद्ध – जनरल डग्लस मॅकआर्थर मनिला येथे परतले.

1948: गांधी वधानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सुरक्षा-निर्बंधान्वये अटक झाली.

1952: स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या.

1958: 7,600 पौंडाचा एक हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने टायबी बेटांजवळ हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.

1962: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांनी अल्जेरियाला स्वातंत्र्य द्यावे असे आवाहन केले.

2003: भारताने 2002 मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-4 या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.

2004: पुण्याची स्वाती घाटे बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.

5 फेब्रुवारी – जन्म

1788: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान रॉबर्ट पील यांचा जन्म.

1840: डनलप रबर चे सहसंस्थापक जॉन बॉईड डनलप यांचा जन्म. (मृत्यू: 23 ऑक्टोबर 1921)

1905: स्वातंत्र्यसैनिक, ४२ च्या चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: 5 ऑगस्ट 1992)

1914: प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्‌मयाचे अभ्यासक व संशोधक, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे यांचा जन्म. (मृत्यू: 30 ऑगस्ट 1994)

1933: लेखिका आणि कथाकथनकार गिरीजा कीर यांचा जन्म.

1936: कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचा जन्म.

1976: अभिनेता अभिषेक बच्‍चन यांचा जन्म.

5 फेब्रुवारी – मृत्यू

1920: आळंदी येथील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग यांनी समाधि घेतली. (जन्म: 14 सप्टेंबर 1867)

1927: हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक हजरत इनायत खाँ यांचे निधन. (जन्म: 5 जुलै 1882)

2000: गायिका कालिंदी केसकर यांचे निधन.

2003: ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधींच्या हरिजन या मराठी अंकाचे संपादक गणेश गद्रे यांचे निधन.

2008: योग गुरू महर्षी महेश योगी यांचे निधन. (जन्म: 12 जानेवारी 1917)

2010: चित्रपट अभिनेता व निर्माता सुजित कुमार यांचे निधन. (जन्म: 7 फेब्रुवारी 1934)

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment