4 फेब्रुवारी दिनविशेष | 4 February DinVishesh | 4 February Important Facts

आजचा IMP GK Point पहा

4 फेब्रुवारी :- जागतिक कर्करोग निवारण दिन

World Cancer Day 2022-2024 theme: ‘Close the Care Gap’

4 फेब्रुवारी – घटना

1670: ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उदगार काढले, त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू.

1789: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात आली.

1922: चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी 3 दिवस उपोषण करुन असहकार आंदोलन मागे घेतले.

1936: कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले रेडिअम हे पहिले किरणोत्सारी मूलद्रव्य बनले.

1944: चलो दिल्ली चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच.

1948: श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.

1961: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान.

2003: युगोस्लाव्हियाचे सर्बिया अँड मोंटेनिग्रो असे नामकरण करण्यात आले आणि नवी राज्यघटना अस्तित्त्वात आली.

2004: मार्क झुकरबर्गने फेसबुकची स्थापना केली.

4 फेब्रुवारी – जन्म

1893: मराठी कोशकार आणि लेखक चिंतामण गणेश कर्वे यांचा जन्म. (मृत्यू: 16 डिसेंबर 1960)

1902: धाडसी अमेरिकन वैमानिक चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: 26 ऑगस्ट 1974)

1917: पाकिस्तानचे 3 रे राष्ट्राध्यक्ष जनरल ह्याह्याखान यांचा जन्म. (मृत्यू: 10 ऑगस्ट 1980)

1922: शास्त्रीय गायक स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी यांचा जन्म. (मृत्यू: 24 जानेवारी 2011)

1938: लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक व गुरू पं. बिरजू महाराज यांचा जन्म.

1974: चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा जन्म.

4 फेब्रुवारी – मृत्यू

1670: नरवीर तानाजी मालुसरे यांचे निधन.

1894: सॅक्सोफोन या वाद्याचे जनक अ‍ॅडोल्फ सॅक्स यांचे निधन. (जन्म: 6 नोव्हेंबर 1814)

1974: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी 1894)

2001: क्रिकेटपटू, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित पंकज रॉय यांचे निधन. (जन्म: 31 मे 1928)

2002: चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक भगवान आबाजी पालव ऊर्फ मास्टर भगवान यांचे निधन. (जन्म: 1 ऑगस्ट 1913)

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment