4 April Current Affairs Notes | 4 एप्रिल चालू घडामोडी नोट्स

● अग्नी-प्राईम बॅलेस्टिक क्षेपणास्राची यशस्वी चाचणी
अग्नी-प्राईम बॅलेस्टिक क्षेपणास्राची ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम बेटावरून चाचणी घेतली. अग्नि-पी हे ड्युअल रिडंडंट नेव्हिगेशन आणि मार्गदर्शन प्रणालीसह दोन-स्टेज कॅनिस्टराइज्ड सॉलिड प्रोपेलंट बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. त्याची श्रेणी 1,000-2,000 km आहे आणि जून 2021 मध्ये प्रथमच त्याची चाचणी घेण्यात आली. हे सर्व आधीच्या अग्नी मालिकेच्या क्षेपणास्त्रांपेक्षा हलके आहे.

● भारतीय हवाई दलाचा ‘गगन शक्ती’ युद्धसराव राजस्थानमध्ये पोखरण येथे सुरू.
जैसलमेर जिल्ह्यातील पोखरण फील्ड फायरिंग रेंज येथे IAF चा सर्वात मोठा सराव ‘गगन शक्ती’ 10 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. भारतीय वायुसेना जैसलमेर जिल्ह्यातील पोखरण फील्ड फायरिंग रेंज येथे ‘गगन शक्ती’ हा सर्वात मोठा सराव करत आहे.  कालपासून सुरू झालेला हा सराव 10 एप्रिलपर्यंत चालणार आहे. या सरावात हवाई दलाची सर्व प्रमुख लढाऊ विमाने आणि आधुनिक हेलिकॉप्टर आपली धडक क्षमता दाखवत आहेत.

● शेफाली बी शरण यांनी PIB च्या प्रमुख महासंचालकपदी नियुक्ती
वरिष्ठ माहिती सेवा अधिकारी शेफली बी शरण यांनी आज प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालकपदाचा पदभार स्वीकारला. 1990 च्या बॅचच्या भारतीय माहिती सेवेच्या (IIS) अधिकारी शरण यांनी मनीष देसाई यांच्या सेवानिवृत्तीनंतर पदभार स्वीकारला.  यापूर्वी, सुश्री शरण यांनी निवडणूक आयोग आणि वित्त मंत्रालयात काम केले आहे.

● उत्तर प्रदेश मध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रिक व्हेइकल्स आहेत.

● NASA अंतराळ संस्था चंद्रावर चालणारी कार बनवणार आहे.

● अमेरिकेतील IHME या संस्थेच्या संशोधकाच्या संशोधनानुसार 1990-2021 या कालावधीत जागतिक पातळीवर सरसारी आर्युमान 6.2 वर्षांनी वाढले आहे. 1990-2021 या कालावधीत भारताचे सरासरी आर्यूमान 8 वर्षांनी वाढले आहे. अमेरिकेतील IHME या संस्थेने केलेल्या संशोधनानुसार दक्षिण आशिया देशात सर्वाधिक आयुर्मान भूतान देशाचे वाढले आहे. 1990-2021 या कालावधीत दक्षिण आशिया देशात सर्वाधिक आयुर्मान भूतानचे 13.6 वर्षांनी वाढले आहे.

● परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन
भारतात तामिळनाडू राज्यात परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे. तामिळनाडू राज्यात एन. रवी यांच्या हस्ते परमवीर उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

● आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून “पारादीप बंदर” उदयास आले आहे. भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून उदयास आलेले पारादीप बंदर हे ओडिशा राज्यात आहे.

● अब्देल फतेह अल-सिसी यांनी इजिप्त देशाच्या अध्यक्ष पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे.

● 4 एप्रिल 2024 रोजी NATO या संघटनेचा 75वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.

● थॉमस चसक बॅडमिंटन स्पर्धा 2024, 27 एप्रिल ते 5 मे कालावधीत चेंगदू (चीन) येथे आयोजित करण्यात येणार आहेत.

● फिफा ने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ 121व्या (4 स्थानाने घसरले) स्थानावर आला आहे. फिफा ने जाहीर केलेल्या क्रमवारीत अर्जेंटिना या देशाचा फुटबॉल संघ प्रथम क्रमांकावर आहे.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment