31 जानेवारी – घटना
1911: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.
1920: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात.
1929: सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले.
1945: युद्धातुन पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला.
1949: बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.
1950: राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी संसदेपुढे पहिले भाषण केले.
1950: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांनी हायड्रोजन बॉम्ब बनवण्याच्या योजनेस मान्यता दिली.
31 जानेवारी – जन्म
1896: कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे तथा अंबिकातनयदत्त यांचा जन्म. (मृत्यू: 21 ऑक्टोबर 1981)
1931: गीतकार कवी व लेखक गंगाधर महांबरे यांचा जन्म. (मृत्यू: 23 डिसेंबर 2008)
1975: चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका प्रीती झिंटा यांचा जन्म.
31 जानेवारी – मृत्यू
1954: एफ. एम. रेडिओचे संशोधक ई. एच. आर्मस्ट्राँग यांचे निधन. (जन्म: 18 डिसेंबर 1890)
1969: आध्यात्मिक गुरू अवतार मेहेरबाबा यांचे निधन. (जन्म: 25 फेब्रुवारी 1894 – पुणे, महाराष्ट्र)
1972: नेपाळचे राजे महेन्द्र यांचे निधन.
1986: संगीतकार विश्वनाथ मोरे यांचे निधन.
1994: मराठी व हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांचे निधन.
1995: बँकिंग तज्ञ, रोखे बाजार नियामक मंडळाचे (SEBI) चे अध्यक्ष सुरेश शंकर नाडकर्णी यांचे निधन.
2000: नाटककार वसंत कानेटकर यांचे निधन. (जन्म: 20 मार्च 1920)
2000: हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक कृष्ण नारायण तथा के. एन. सिंग यांचे निधन. (जन्म: 1 सप्टेंबर 1908 – डेहराडून, उत्तराखंड)
2004: व्हायोलिनवादक व्ही. जी. जोग यांचे निधन. (जन्म: 22 फेब्रुवारी 1922)
2004: गायिका व अभिनेत्री सुरैय्या जमाल शेख ऊर्फ सुरैय्या यांचे निधन. (जन्म: 15 जून 1929)