
● 30 जानेवारी रोजी कोणता दिन साजरा केला जातो ?
√ योग्य उत्तर :- हुतात्मा दिन (महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने देशभर हुतात्मा दिन साजरा केला जातो)
30 जानेवारी – घटना
● 1649: इंग्लंडचे राजा पहिले चार्ल्स यांचा शिरच्छेद करण्यात आला.
● 1933: अॅडॉल्फ हिटलर यांना जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी झाला.
● 1948: नथुराम गोडसे याने मोहनदास करमचंद ऊर्फ महात्मा गांधी यांचा सायंकाळी 5 वाजून 17 मिनिटांनी प्रार्थना करीत असताना गोळ्या घालून खून केला.
● 1994: पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.
● 1997: महात्मा गांधीच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरूण गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. 47 वर्षे या अस्थी कटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये होत्या.
● 1999: पण्डित रविशंकर यांना भारतरत्न जाहीर.
30 जानेवारी – जन्म
● 1882: अमेरिकेचे 32 वे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांचा जन्म. (मृत्यू: 12 एप्रिल 1945)
● 1910: गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल सी. सुब्रम्हण्यम यांचा जन्म. (मृत्यू: 8 नोव्हेंबर 2000)
● 1911: शास्त्रीय गायक पं. गजाननबुवा जोशी यांचा जन्म. (मृत्यू: 28 जून 1987)
● 1917: स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: 27 जुलै 2007)
● 1927: स्वीडनचे 26 वे पंतप्रधान ओलोफ पाल्मे यांचा जन्म. (मृत्यू: 28 फेब्रुवारी 1986)
● 1929: हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक रमेश देव यांचा जन्म.
● 1949: नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते, थिएटर अॅकॅडमी चे एक संस्थापक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा चे संचालक, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते डॉ. सतीश आळेकर यांचा जन्म.
30 जानेवारी – मृत्यू
● 1948: महात्मा गांधी यांची हत्या. (जन्म: 2 ऑक्टोबर 1869)
● 1948: आपला भाऊ विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते ऑर्व्हिल राईट यांचे निधन. (जन्म: 19 ऑगस्ट 1871)
● 1951: ऑस्ट्रियन वाहन अभियंता फर्डिनांड पोर्श यांचे निधन. (जन्म: 3 सप्टेंबर 1875)
● 1996: हार्मोनियम व ऑर्गन वादक गोविंदराव पटवर्धन यांचे निधन.
● 2000: मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर यांचे निधन.
● 2004: गीतकार रमेश अणावकर यांचे निधन.