3 जानेवारी – घटना
● 1496 : लिओनार्डो दा विंची यांचा उड्डाणयंत्राचा प्रयोग अयशस्वी झाला.
● 1925 : बेनिटो मुसोलिनी इटलीचे हुकूमशहा बनले.
● 1947 : अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.
● 1950 : पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्घाटन झाले.
● 1952 : स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.
● 1957 : हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.
● 2004 : नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राज्य संरक्षित स्मारक राष्ट्राला अर्पण केले.
3 जानेवारी – जन्म
● 1831 : पहिल्या स्त्री शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म. (मृत्यू: 10 मार्च 1897)
● 1883 : इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट अॅटली यांचा जन्म.
● 1921 : हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक चेतन आनंद यांचा जन्म.
● 1931 : मराठी लेखक आणि इतिहास संशोधक डॉ. यशवंत दिनकर फडके यांचा जन्म. (मृत्यू: 11 जानेवारी 2008)
3 जानेवारी – मृत्यू
● 2000 : स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री सुशीला नायर यांचे निधन. (जन्म: 26 डिसेंबर 1914)
● 2002 : भारीतय अंतराळ शास्रज्ञ सतीश धवन यांचे निधन. (जन्म: 25 सप्टेंबर 1920)