3 फेब्रुवारी दिनविशेष | 3 February DinVishesh | 3 February Important Facts

3 फेब्रुवारी – घटना

1783: स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.

1870: अमेरिकेच्या संविधानातील 15 वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले.

1925: भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली.

1928: सायमन गो बॅक या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला.

1966: सोव्हिएत रशियाने लूना-9 हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले.

3 फेब्रुवारी – जन्म

1821: वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल  यांचा जन्म. (मृत्यू: 31 मे 1910)

1830: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान रॉबर्ट आर्थर टॅलबोट यांचा जन्म. (मृत्यू: 22 ऑगस्ट 1903)

1887: स्पेनचे पंतप्रधान हुआन नेग्रिन यांचा जन्म.

1900: रसायनशास्त्रज्ञ तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री यांचा जन्म. (मृत्यू: 27 सप्टेंबर 1975)

1963: भारतीय अर्थतज्ञ रघुराम राजन यांचा जन्म.

3 फेब्रुवारी – मृत्यू

1468: जर्मन प्रकाशक, स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक योहान्स गटेनबर्ग यांचे निधन.

1832: पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली. (जन्म: 7 सप्टेंबर 1791)

1924: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे 28 वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांचे निधन. (जन्म: 28 डिसेंबर 1856)

1969: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांचे निधन. (जन्म: 15 सप्टेंबर 1909)

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment