3 April Current Affairs Notes | 3 एप्रिल चालू घडामोडी नोट्स

● पहिला “जागतिक असमानता संशोधन पुरस्कार” बीना अग्रवाल & जेम्स बॉयस  यांना प्रदान.
“जागतिक असमानता संशोधन पुरस्कार” (1st Global Inequality Research Award (GiRA-Award) – 2024) हा पुरस्कार The World Inequality Lab (#WIL) and  Sciences Po’s Center for Research on Social Inequalities (#CRIS) यांच्या तर्फे बीना अग्रवाल & जेम्स बॉयस यांना प्रदान करण्यात आला.
● कशासाठी ?
“सामाजिक आणि पर्यावरणीय असमानता समजून घेण्यासाठी त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी “

● चिपको आंदोलनाला 50 वर्ष पूर्ण
चिपको आंदोलनाला 26 मार्च 2024 रोजी 50 वर्ष पूर्ण झाली…. त्यामुळे आगामी परीक्षेत यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो..
चिपको आंदोलनाला नुकतीच (26 मार्च) 50 वर्षे पूर्ण झाली. पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी तसेच जंगलांच्या संवर्धनासाठी उत्तर प्रदेशातील चमोली जिल्ह्यातील (आताचा उत्तराखंड) या अहिंसक चळवळीचे लोण पुढल्या सर्व काळात कसे पसरत गेले.
महत्वाचे :-
सुंदरलाल बहुगुणा चिपको आंदोलनाचे प्रणेते व गांधीवादी कार्यकर्ते होते.
पर्यावरण संरक्षणासाठी त्यांनी 1970 मध्ये अहिंसात्मक मार्गाने चिपको आंदोलन सुरू केले. 2009 मध्ये पर्यावरण संरक्षणासाठी त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. “Ecology is permanent economy” हे चिपको आंदोलनाचे बोधवाक्य होते.

● भारताचा विकासदर 7.5 टक्के; जागतिक बँकेचा अंदाज.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 7.5 टक्के राहील, तर आर्थिक वर्ष 2025 साठी 6.6 टक्के राहील, असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. बँकेने आर्थिक वर्ष 2023-24 साठी याआधी 6.3 टक्के दराने वाढीचा अंदाज वर्तवला होता. तो आता 1.2 टक्क्यांनी वाढवला आहे.

● दक्षिण कोरियाने बनवला ‘कुत्रिम सूर्य’!
भविष्यातील औद्योगिक ऊर्जेच्या दिशेने हा एक मैलाचा दगड सिद्ध होईल.
अलीकडेच चीनने असा ‘कृत्रिम सूर्य’ बनवला होता. आता दक्षिण कोरियाच्या वैज्ञानिकांनी 10 कोटी अंश सेल्सिअस तापमान निर्माण करून नवा विक्रम केला आहे. इतके तापमान आतापर्यंत कोणत्याच देशाने निर्माण केले नाही.

●  फोर्ब्स मॅगझिनची जगातील सर्वांत श्रीमंतांची 2024 ची यादी प्रसिद्ध
अमेरिकी बिझनेस मॅगझिन फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या 2024 मधील जगातील सर्वांत श्रीमंताच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी नवव्या स्थानी असून, त्यांची संपत्ती 116 अब्ज डॉलर आहे. अंबानी यांनी जगातील नवव्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती आणि भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून आपले स्थान कायम राखले आहे. भारतातील अब्जाधीशांच्या यादीत ते पहिल्या स्थानावर आहेत.

● या वर्षात अब्जाधीश भारतीयांची संख्या 2023 मधील 169 वरून 200 वर गेली असून, त्यांची एकूण संपत्ती विक्रमी 954 अब्ज डॉलर आहे. वर्ष 2023 मध्ये ती 675 अब्ज डॉलर होती, त्यात वर्षभरात 41 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या यादीनुसार, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत भारतीय आहेत, त्यांची एकूण संपत्ती 84 अब्ज डॉलर आहे. भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल या आहेत, त्या चौथ्या क्रमांकाची श्रीमंत भारतीय आहेत, गेल्या वर्षी त्या सहाव्या स्थानावर होत्या. त्यांची एकूण संपत्ती 33.5 अब्ज डॉलर आहे. या यादीत नव्या 25 अब्जाधीशांचाही समावेश आहे.

● जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकाची सर्वांत श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अर्नोल्ट ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 233 अब्ज डॉलर आहे. त्यानंतर 195 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह एलॉन मस्क दुसऱ्या स्थानावर आहेत. 194 अब्ज डॉलर संपत्तीसह जेफ बेझोस तिसऱ्या, 177 अब्ज डॉलर संपत्तीचे धनी मार्क झुकेरबर्गचौथ्या, तर 114 अब्ज डॉलर संपत्तीसह लॅरी एलिसन पाचव्या स्थानावर आहेत.

तैवानला भूकंपाचा 7.2 रिश्टर स्केलचा धक्का
तैवानला आज सकाळी जोरदार भूकंपाचा धक्का बसल्याने पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले. रिश्टर स्केलवर 7.2 इतकी तीव्रता असलेल्या या भूकंपात सात जणांचा मृत्यू झाला असून सातशेहून अधिक जण जखमी झाले. तैवानला मागील 25 वर्षांत बसलेला हा सर्वांत मोठा भूकंपाचा धक्का होता.

● बोपन्ना-एबडेनला विजेतेपद
एटीपी मास्टर्स खुली 1000 स्पर्धा जागतिक क्रमवारीत अग्रस्थान गाठले. भारताचा तारांकित टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेन यांनी एटीपी मास्टर्स खुल्या 1000 स्पर्धेतील दुहेरीचा किताब पटकावला. बोपन्ना कारकीर्दीतल्या 14 व्या एटीपी 1000 स्पर्धा आणि एटीपीच्या 63व्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळत होता. बोपन्नाने या विजेतेपदाच्या जोरावर दुहेरीतील आपल्या विजेतेपदांची संख्या 26 पर्यंत वाढवली. लिएंडर पेसनंतर भारताकडून नऊ एटीपी मास्टर्स स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा विक्रम याअगोदरच त्याने आपल्या नावावर केला आहे.

● दोस्ती 16 संयुक्त युद्ध सराव
दोस्ती 16 संयुक्त युद्ध सरावामध्ये “भारत, श्रीलंका आणि मालदीव” देशाचा समावेश आहे. दोस्ती 16 या संयुक्त सरावाचे आयोजन मालदीव या देशात करण्यात आले आहे.

● IWF वर्ल्ड कप 2024
आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशन द्वारे थायलंड या देशात IWF वर्ल्ड कप 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. थायलंड मध्ये ’31 मार्च ते 11 एप्रिल’ कालावधीत IWF वर्ल्ड कप 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. थायलंड मध्ये आयोजित IWF वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताच्या बिंदिया राणी देवी ने कास्य पदक जिंकले आहे.

● My CHGS हे ॲप ” केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण” मंत्रालयाकडून लाँच करण्यात आले आहे.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment