29 जानेवारी दिनविशेष | 29 January DinVishesh | 29 January Important Facts

29 जानेवारी – घटना

1780: जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कलकत्ता जनरल अ‍ॅडव्हर्टायझर या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले.

1861: कॅन्सास हे अमेरिकेचे 34 वे राज्य बनले.

1886: कार्ल बेंझ यांना जगातील पहिल्या इंजिनवर चालणार्‍या मोटरगाडीचे पेटंट मिळाले.

1975: इंडियन नॅशनल थिएटर निर्मित ती फुलराणी या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.

1989: हंगेरीने दक्षिण कोरियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.

29 जानेवारी – जन्म

1274: संत निवृत्तीनाथ यांचा जन्म. (मृत्यू: 17 जून 1297)

1737: अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक थॉमस पेन यांचा जन्म. (मृत्यू: 8 जून 1809)

1843: अमेरिकेचे 25 वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅक किनले यांचा जन्म. (मृत्यू: 14 सप्टेंबर 1901)

1853: ओडिया साहित्यिक मधुसूदन राव यांचा जन्म.

1860: रशियन कथाकार व नाटककार अंतॉन चेकॉव्ह यांचा जन्म. (मृत्यू: 15 जुलै 1904)

1866: साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक रोमें रोलाँ यांचा जन्म. (मृत्यू: 30 डिसेंबर 1944)

1922: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 4 थे सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ रज्जू भैय्या यांचा जन्म. (मृत्यू: 14 जुलै 2003)

1926: भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते एकमेव मुस्लिम डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम यांचा जन्म. (मृत्यू: 21 नोव्हेंबर 1996 – ऑक्सफर्ड, इंग्लंड)

1951: वेस्ट इंडिजचे जलदगती गोलंदाज अँडी रॉबर्टस यांचा जन्म.

1970: ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता भारतीय नेमबाज राज्यवर्धनसिंग राठोड यांचा जन्म.

29 जानेवारी – मृत्यू

1597: मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप यांचे निधन. (जन्म: 9 मे 1540)

1820: इंग्लंडचा राजा जॉर्ज (तिसरा) यांचे निधन. (जन्म: 4 जून 1738)

1934: नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रिटझ हेबर यांचे निधन. (जन्म: 9 डिसेंबर 1868 – वॉर्क्लॉ, पोलंड)

1963: लेखक व संपादक सदाशिव आत्माराम जोगळेकर यांचे निधन.

1963: अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांचे निधन. (जन्म: 26 मार्च 1874)

1993: गणितज्ञ रँग्लर गोपाळकृष्ण लक्ष्मण चंद्रात्रेय यांचे निधन.

1995: रुपेरी पडद्यावरील खलनायक, निर्माते व दिग्दर्शक रुपेश कुमार यांचे निधन.

2000: बासरीवादक देवेन्द्र मुर्डेश्वर यांचे निधन.

2000: शिवसेना नेते पांडुरंग सावळाराम तथा काका वडके यांचे निधन.

2001: महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री राम मेघे यांचे निधन.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment