27 जानेवारी दिनविशेष | 27 January DinVishesh | 27 January Important Facts

27 जानेवारी – घटना

98: ट्राजान हे रोमन सम्राट झाले.

1980: थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेच्या दिव्यासाठी पेटंट घेतले.

1888: वॉशिंग्टन डी. सी. येथे द नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी ची स्थापना.

1926: जॉन लोगीबेअर्ड यांनी प्रथमतः टेलिव्हिजनचे प्रात्यक्षिक दाखवले.

1944: दुसरे महायुद्ध – 872 दिवस लेनिनग्राडला घातलेला वेढा जर्मन फौजांनी उठवला.

1945: दुसरे महायुद्ध – रशियाच्या रेड आर्मीने पोलंडमधील ऑस्विच येथील छळछावणीतील बंदिवानांची मुक्तता केली.

1967: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था बालभारती या नावाने ओळखली जाते.

1967: केनेडी अंतराळ केंद्रात अपोलो – 1 या अंतराळयानाच्या चाचणी दरम्यान आग लागून त्यात गस ग्रिसम, एडवर्ड व्हाइट व रॉजर शॅफी हे अंतराळवीर मृत्युमुखी पडले

1973: पॅरिसमध्ये झालेल्या एका करारान्वये 31 वर्षे चालू असलेले व्हिएतनाम युद्ध संपुष्टात आले. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला व्हिएतनामसमोर माघार घ्यावी लागली.

1983: जगातील सगळ्यात मोठा पाण्याखालचा बोगदा (53.900 किमी) जपानच्या होन्शू व होक्काइदो बेटांमध्ये खुला करण्यात आला.

27 जानेवारी – जन्म

1756: ऑस्ट्रियन संगीतकार वूल्फगँग मोझार्ट यांचा जन्म. (मृत्यू: 5 डिसेंबर 1791)

1850: आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान एडवर्ड जे. स्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: 15 एप्रिल 1912)

1901: विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा जन्म. (मृत्यू: 27 मे 1994)

1922: हिन्दी चित्रपटांतील खलनायक अजित खान ऊर्फ अजित यांचा जन्म. (मृत्यू: 22 ऑक्टोबर 1998)

1926: भारताचे 13 वे लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचा जन्म. (मृत्यू: 10 ऑगस्ट 1986)

1967: हिन्दी चित्रपट कलाकार बॉबी देओल यांचा जन्म.

27 जानेवारी – मृत्यू

1947: रोटरी क्लबचे संस्थापक पॉल हॅरिस यांचे निधन. (जन्म: 19 एप्रिल 1868)

1968: नाटककार व साहित्यिक सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ कुमुदबांधव यांचे निधन. (जन्म: 26 मे 1902)

1986: मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी यांचे निधन. (जन्म: 14 ऑक्टोबर 1931)

2007: पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक कमलेश्वर यांचे निधन. (जन्म: 6 डिसेंबर 1932)

2008: इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो यांचे निधन. (जन्म: 8 जून 1921)

2009: भारताचे 8 वे राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांचे निधन. (जन्म: 4 डिसेंबर 1910)

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment