26 जानेवारी – घटना
1565: विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचे सुलतान यांच्यात तालिकोटा येथे लढाई झाली. या लढाईत रामरायाचा पराभव होऊन दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरूवात झाली.
1662: लोहगड-विसापूर आणि तिकोना या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजांच्या चढाया.
1837: मिचिगन हे अमेरिकेचे 26 वे राज्य बनले.
1876: मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली.
1924: रशियातील सेंट पीट्सबर्गचे लेनिनग्राड असे नामकरण करण्यात आले.
1933: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून 26 जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्याला सूरुवात केली.
1942: दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांचे युरोपातील नॉर्दन आयर्लंड येथे आगमन.
1949: भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला.
1950: भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला.
1950: एच. जे. कनिया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
1965: भारताने हिंदी भाषाला शासकीय भाषा जाहीर केले.
1978: महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सुरू.
1998: कॅप्टन लक्ष्मी व उषा मेहता यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान.
2001: गुजरातमधील कच्छ भागात झालेल्या मोठ्या भूकंपात सुमारे 20,000 लोक ठार झाले.
26 जानेवारी – जन्म
1891: बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोर्हे यांचा जन्म. (मृत्यू: 17 मार्च 1937)
1921: सोनी कार्पोरेशनचे संस्थापक अकिओ मोरिटा यांचा जन्म. (मृत्यू: 3 ऑक्टोबर 1999)
1925: अभिनेता, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर पॉल न्यूमन यांचा जन्म. (मृत्यू: 26 सप्टेंबर 2008)
1957: क्रिकेटपटू शिवलाल यादव यांचा जन्म.
26 जानेवारी – मृत्यू
1730: कवी श्रीधर यांनी समाधि घेतली.
1823: देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांचे निधन. (जन्म: 17 मे 1749)
1954: देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक मानवेंद्रनाथ रॉय यांचे निधन. (जन्म: 21 मार्च 1887)
1968: लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांचे निधन. (जन्म: 29 ऑगस्ट 1880)
2015: व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण यांचे निधन. (जन्म: 24 ऑक्टोबर 1921)