25 जानेवारी दिनविशेष | 25 January DinVishesh | 25 January Important Facts

25 जानेवारी – घटना

1755: मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.

1881: थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.

1919: पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली.

1941: प्रभात चा शेजारी हा चित्रपट रिलीज झाला.

1971: हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे 18 वे राज्य बनले.

1982: आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्‍न प्रदान.

1991: मोरारजी देसाई यांना भारतरत्‍न प्रदान.

1995: अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis) माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले.

2001: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना भारतरत्‍न प्रदान.

25 जानेवारी – जन्म

1627: आयरिश रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट बॉईल यांचा जन्म. (मृत्यू: 30 डिसेंबर 1691)

1736: इटालियन गणितज्ञ जोसेफ लाग्रांगे यांचा जन्म. (मृत्यू: 10 एप्रिल 1813)

1862: सेवा सदन च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई रानडे यांचा जन्म.

1882: ब्रिटिश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांचा जन्म. (मृत्यू: 28 मार्च 1941)

1938: नाटककार व समीक्षक सुरेश खरे यांचा जन्म.

1958: पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती यांचा जन्म.

25 जानेवारी – मृत्यू

1665: सोनोपंत डबीर यांचे निधन. (महाराजसाहेब शहाजी राजे यांचे विश्वासू सेवक. स्वराज्याचे पहिले पेशवे.)

1980: सोलापूरचे दाते पंचांग कर्ते लक्ष्मणशास्त्री दाते यांचे निधन.

2001: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या विजयाराजे शिंदे यांचे निधन.

2015: ज्येष्ठ समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांचे निधन. (जन्म: 1 फेब्रुवारी 1927 – हातकणंगले)

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment