2 जानेवारी – घटना
● 1757 : प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.
● 1881 : लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरु केले.
● 1885 : पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु.
● 1905 : मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला.
● 1936 : मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाची स्थापना.
● 1942 : दुसरे महायुद्ध दरम्यान जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.
●1945 : दुसरे महायुद्ध – जर्मनीच्या वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी फ्रेंच, बेल्जियम आणि हॉलंड मधील विमानतळांवर हल्ले केले.
●1951 : रशियाने ‘ल्युना-1’ हे अंतराळयान चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित केले.
● 1954 : राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली.
● 1985 : पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन.
● 1989 : मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या.
● 1998 : डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान केली.
● 1999 : अमेरिकेत हिमवादळात मिल वॉकीमध्ये 14 इंच टर शिकोगामध्ये 19 इंच हिम पडला. शिकागोचे तापमान -13°F इतके कमी झाले.
● 2000 : संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.
● 2000 : पनामा सरकारने 85 कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.
2 जानेवारी – जन्म
● 1920 : अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक आयझॅक असिमॉव्ह यांचा जन्म. (मृत्यू : 6 एप्रिल 1992)
● 1932 : अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांचा जन्म. (मृत्यू : 20 ऑगस्ट 1985)
● 1959 : भारतीय क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांचा जन्म.
● 1960 : भारतीय क्रिकेटपटू रमण लांबा यांचा जन्म. (मृत्यू : 23 फेब्रुवारी 1998)
2 जानेवारी – मृत्यू
● 1316 : दिल्लीचे सुलतान अल्लाउद्दीन खिलजी यांचे निधन.
● 1935 : स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचे निधन. (जन्म: 19 ऑगस्ट 1886)
● 1943 : हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचे निधन.
● 1944 : अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन. (जन्म : 23 एप्रिल 1873)
● 1952 : व्यक्तींचे पुतळे करणारे महान शिल्पकार जो डेव्हिडसन यांचे निधन.
● 1989 : मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांचे निधन.
● 2002 : पर्यावरणवादी अनिल अग्रवाल यांचे निधन.
● 2015 : भारतीय शास्रज्ञ वसंत गोवारीकर यांचे निधन.
Thank you for this, really you’re doing a great job👍⚡
Thank you.