2 फेब्रुवारी दिनविशेष | 2 February DinVishesh | 2 February Important Facts

Dinvishesh_2_February

आजचा IMP GK POINT पहा

इराणमधील रामसर येथे 1971 मध्ये पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या करारावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांपैकी भारत हा एक आहे.
2 फेब्रुवारी 1971 रोजी पाणथळ क्षेत्राबाबत हा आंतरराष्ट्रीय करार स्वीकारल्याच्या स्मरणार्थ जागतिक पाणथळ दिन जगभरात साजरा केला जातो.
● जागतिक पाणथळ दिन 2024 ची संकल्पना  ‘पाणथळ जागा आणि मानवी कल्याण’ अशी आहे.
● आपले जीवन सुधारण्यात पाणथळ जागांची  महत्त्वाची भूमिका, ही संकल्पना अधोरेखित करते. पूर संरक्षण, स्वच्छ पाणी, जैवविविधता आणि मनोरंजनाच्या संधी या मानवी आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी आवश्यक असलेल्या बाबींमधील पाणथळ जागांचे योगदान यातून अधोरेखित होते.

2 फेब्रुवारी – घटना

1848: कॅलिफोर्निया गोल्ड रश – सोने मिळवण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला जथा कॅलिफोर्नियात दाखल झाला.

1933: अ‍ॅडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.

1943: दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्मन सैन्याच्या माघारीची सुरूवात झाली.

1957: गोवा मुक्तीसंग्राम – नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.

1962: 400 वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो हे ग्रह एका रेषेत आले.

1971: इराणमधील रामसर येथे पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जगभर जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला.

1971: इदी अमीन हे युगांडाचे सर्वेसर्वा बनले.

2 फेब्रुवारी – जन्म

1754:  फ्रान्सचे पंतप्रधान चार्ल्स मॉरिस डी टॅलीरॅड यांचा जन्म. (मृत्यू: 17 मे 1838)

1856: स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांचा जन्म. (मृत्यू: 23 डिसेंबर 1926)

1884: ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म. (मृत्यू: 10 एप्रिल 1937 – पुणे)

1897: हॉवर्ड जॉन्सन कंपनीचे संस्थापक हॉवर्ड डीरिंग जॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: 20 जून 1972)

1905: जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या अ‍ॅन रँड यांचा जन्म. (मृत्यू: 6 मार्च 1982)

1922: भारतीय फील्ड हॉकीपटू कुंवर दिग्विजय सिंग यांचा जन्म. (मृत्यू: 27 मार्च 1978)

1923: केंद्रीय रेल्वे मंत्री, गृह राज्यमंत्री, अर्थ राज्यमंत्री, पहिल्या, दुसर्‍या व पाचव्या लोकसभेचे सदस्य, राज्यसभा खासदार ललित नारायण मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: 3 जानेवारी 1975– समस्तीपूर, बिहार)

1979: अभिनेत्री शमिता शेट्टी यांचा जन्म.

2 फेब्रुवारी – मृत्यू

1907: रशियन रसायनशास्त्रज दिमित्री मेंदेलिएव्ह याचं निधन. (जन्म: 8 फेब्रुवारी 1834)

1917: लोकमान्य टिळकांचे स्‍नेही आणि विख्यात वैद्य महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांनी देहत्याग केला. (जन्म: 4 मे 1847)

1930: लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे याचं निधन. (जन्म: 12 एप्रिल 1871)

1970: ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार बर्ट्रांड रसेल याचं निधन. (जन्म: 18 मे 1872)

1987: स्कॉटिश साहसकथा लेखक अ‍ॅलिएस्टर मॅकलिन याचं निधन. (जन्म: 21 एप्रिल 1922)

2007: हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता विजय अरोरा याचं निधन. (जन्म: 27 डिसेंबर 1944)

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment