
18 जानेवारी – घटना
1778: कॅप्टन जेम्स कूक हे हवाई बेटांवर पोचणारे पहिले युरोपियन ठरले.
1911: युजीन बी. इलाय यांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु. एस. एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.
1956: संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईमध्ये गोळीबार. यात 10 लोक ठार, 250 जखमी, दंगल वाढल्याने 24 तास कर्फ्यू लावण्यात आला.
1964: न्यूयॉर्क येथे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन झाले.
1974: इजिप्त व इस्त्राएल यांच्यात शांतता करारावर सह्या झाल्या.
1997: नॉर्वेच्या बोर्ग औसलँडने एकट्याने अटलांटिक महासागर पार केला.
1998: मदनमोहन पूंछी यांनी भारताचे 28 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
1999: नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
2005: एअरबस ए-380 या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमानाचे अनावरण करण्यात आले.
18 जानेवारी – जन्म
1793: महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. (मृत्यू: 4 ऑक्टोबर 1847)
1842: न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म. (मृत्यू: 16 जानेवारी 1909)
1854: अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचा मदतनीस तसेच त्यांचा पहिल्या दुरध्वनी संभाषणातील भागीदार थॉमस वाॅॅॅटसन यांचा जन्म.
1889: नाट्यछटाकार शंकर काशिनाथ गर्गे उर्फ दिवाकर यांचा जन्म. (मृत्यू: 1 ऑक्टोबर 1931)
1889: कन्नड कवी व विचारवंत देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. यांचा जन्म. (मृत्यू: 7 ऑक्टोबर 1975 – बंगळुरू, कर्नाटक)
1892: अमेरिकन अभिनेता ऑलिव्हर हार्डी यांचा जन्म.
1933: अमेरिकन संशोधक रे डॉल्बी यांचा जन्म.
1933: भारताचे 27 वे सरन्यायाधीश जगदीश शरण वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: 22 एप्रिल 2013)
1952: चंदन तस्कर वीरप्पन यांचा जन्म. (मृत्यू: 18 ऑक्टोबर 2004)
1972: भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांचा जन्म.
1995: साहित्यिक, कवी आणि शिक्षणतज्ज्ञ वि. द. घाटे यांचा जन्म.
18 जानेवारी – मृत्यू
1936: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखक रुडयार्ड किपलिंग यांचे निधन. (जन्म: 30 डिसेंबर 1865)
1947: भारतीय अभिनेता आणि गायक के. एल. सैगल उर्फ कुंदनलाल सैगल यांचे निधन. (जन्म: 11 एप्रिल 1904)
1967: कृषितज्ज्ञ डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे निधन.
1971: भारतीय वकील आणि संसद सदस्य बॅरीस्टर नाथ पै यांचे निधन.
1993: कृतिशील विचारवंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचे निधन. (जन्म: 12 मे 1905)
1996: अभिनेते आणि राजकीय नेते एन. टी. रामाराव यांचे निधन. (जन्म: 28 मे 1923)
2003: हिंदी साहित्यिक आणि कवी हरिवंशराय बच्चन यांचे निधन. (जन्म: 27 नोव्हेंबर 1907)