14 जानेवारी – घटना
1761: मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसर्याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलुन गेला.
1923: विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.
1948: लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.
1994: मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला.
1998: ज्येष्ठ गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर.
2000: ज्येष्ठ समाजसेवक मुरलीधर देविदास आमटे उर्फ बाबा आमटे यांना 1999 चा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
14 जानेवारी – जन्म
1882: संततिनियमन आणि लैंगिक शिक्षणावर काम करणारे कृतीशील विचारवंत रघुनाथ धोंडो कर्वे यांचा जन्म. (मृत्यू: 14 ऑक्टोबर 1953)
1883: जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर निना रिकी यांचा जन्म. (मृत्यू: 30 नोव्हेंबर 1970)
1892: भारतीय क्रिकेटपटू दिनकर बळवंत देवधर यांचा जन्म. (मृत्यू: 24 ऑगस्ट 1993)
1896: भारताचे अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ सी. डी. देशमुख यांचा जन्म. (मृत्यू: 2 ऑक्टोबर 1982)
1905: मराठी अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा जन्म. (मृत्यू: 22 सप्टेंबर 1991)
1908: ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत द्वा. भ. कर्णिक यांचा जन्म.
1919: गीतकार सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी यांचा जन्म. (मृत्यू: 10 मे 2002)
1923: अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: 25 ऑक्टोबर 2009)
1926: ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांचा जन्म. त्यांना 1996 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. (मृत्यू: 28 जुलै 2016)
1931: ऊर्दू शायर सईद अहमद शाह ऊर्फ अहमद फराज यांचा जन्म. (मृत्यू: 25 ऑगस्ट 2008)
1977: भारतीय फॉर्म्यूला कार रेसिंग ड्रायव्हर नरेन कार्तिकेयन यांचा जन्म.
14 जानेवारी – मृत्यू
1742: धुमकेतू साठी प्रसिद्ध असलेले ब्रिटीश अंतरीक्षशास्त्रज्ञ एडमंड हॅले यांचे निधन. हॅलेचा धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो. शेवटचा 1986 साली दिसला होता. (जन्म: 8 नोव्हेंबर 1656)
1761: पानिपतच्या तिसर्या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचे निधन. (जन्म: 4 ऑगस्ट 1730)
1761: पानिपतच्या 3 र्या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव यांचे निधन. (जन्म: 2 मार्च 1742)
2001: माहितीपट निर्माते फली बिलिमोरिया यांचे निधन.