14 एप्रिल चालू घडामोडी नोट्स
● भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी.
➤ भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. परदेशातून उच्च शिक्षण घेऊन परतल्यानंतर डॉ. आंबेडकर यांनी 1923 मध्ये वकिलीस सुरुवात केली होती. त्यास 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त उभारण्यात आलेल्या डॉ. आंबेडकरांच्या या पुतळ्याचे 26 नोव्हेंबर 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते.
● डॉ. गगनदीप कांग यांना प्रतिष्ठित जॉन डर्क्स ग्लोबल हेल्थ पुरस्काराने सन्मानित
डॉ. गगनदीप कांग (भारतीय संशोधक) यांना जागतिक आरोग्य संशोधनातील त्यांच्या कामगिरीबद्दल 2024 चा जॉन डर्क्स कॅनडा गायर्डनर ग्लोबल हेल्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कॅनडाचे गार्डनर फाउंडेशन हा पुरस्कार प्रदान करते.
● उद्योगपती आणि पायलट गोपी थोताकुरा हे पहिले भारतीय अवकाश पर्यटक ठरणार आहेत.
● उपाध्यक्ष जगदीप धनखर यांनी प्रा. रमण मित्तल आणि डॉ. सीमा सिंग यांच्या ‘द लॉ अँड स्पिरिच्युॲलिटी: रिकनेक्टिंग द बॉण्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे.
● 2024 मध्ये जालियावाला बाग हत्याकांडाला 105 वर्षे पूर्ण होत आहेत.
● अदानी ग्रीन एनर्जी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क तयार करणार आहे.
● जगजीत पावडिया यांची आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी पुन्हा निवड झाली आहे.
● न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांची राष्ट्रीय न्यायिक अकादमीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
● मध्य प्रदेशातील पारंपारिक गोंड पेंटिंगला जीआय टॅग दर्जा मिळाला आहे.
● ‘सच्चिदानंद मोहंती’ यांची विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
● कन्नड भाषेतील प्रसिद्ध लेखिका ममता जी. सागर यांना जागतिक साहित्य संस्थेने (WOW) ‘आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार’ प्रदान केला आहे.
● हैदराबादची मूळ भारतीय-अमेरिकन अभिनेत्री अवंतिका वंदनापू हिला हार्वर्ड विद्यापीठाने “दक्षिण आशियाई पर्सन ऑफ द इयर” पुरस्कार आणि पदवीने सन्मानित केले आहे.
● राष्ट्रपती ज्युलियस माडा बायो(सिएरा लिओन) यांनी झोम्बी ड्रग संकटाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली.
● सर्वाधिक मतदान केंद्र असणारे मतदारसंघ/ जिल्हा पुणे(8382) आहे. सर्वात कमी मतदान केंद्र असणारे मतदारसंघ/ जिल्हा सिंधुदुर्ग(918) आहे.
● जगातील सर्वाधिक 407 मीटर लांबीचा SkyWalk प्रकल्प अमरावती जिल्ह्यात मेळघाटातील चिखलदरा येथे तयार होत आहे.
● SRH या IPL मधील संघाचा सर्वाधिक 287 धावांचा विक्रम
SRH म्हणजेच सनरायझर्स हैदराबाद या IPL मधील संघाने आज सर्वाधिक 287 धावांचा विक्रम केला. आज रॉयल चॅलेंजर बंगलोर (RCB) संघाविरुद्ध ही कामगिरी केली.
IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारा SRH संघ पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहे
IPL मध्ये सर्वात जास्त धावा करणारे संघ.
1) SRH :- 287/3
2) SRH :- 277/3
3) KKR :- 272/7
4) RCB :- 263/5
5) RCB :- 262/7
● T20 क्रिकेट मध्ये 500 सिक्स मारणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे