13 जानेवारी चालू घडामोडी नोट्स || 13 January Current Affairs Notes

अरुणा नायर यांची रेल्वे बोर्डाच्या सचिवपदी नियुक्ती
● 1987 च्या बॅचच्या भारतीय रेल्वे कार्मिक सेवा (IRPS) अधिकारी अरुणा नायर यांनी रेल्वे बोर्डाच्या सचिवाची भूमिका स्वीकारली आहे.
● रेल्वे बोर्डात अतिरिक्त सदस्य, कर्मचारी आणि प्रधान कार्यकारी संचालक/कर्मचारी म्हणून काम करणे यासह विस्तृत पार्श्वभूमी असलेल्या, तिने 6 जानेवारी रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारला.
● विशेष म्हणजे, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने तिची IRMS स्तर-16 मध्ये सचिव म्हणून नियुक्ती केली. 
● या स्तरावर IRMS मध्ये पॅनेलमध्ये समाविष्ट झालेल्या त्या पहिल्या IRPS अधिकारी आहेत.

2028 पर्यंत पहिले भारतीय अंतराळ स्थानक सुरू करण्याचं इस्रोचे उद्दिष्ट
● आपल्या सध्याच्या तंत्रज्ञान क्षमतांचा वापर करून 2028 पर्यंत अंतराळात स्वतंत्रपणे भारतीय अवकाश स्थानक तयार करण्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे उद्दिष्ट आहे अशी माहिती इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली. ते काल व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेदरम्यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक या विषयावरील परिसंवादाला संबोधित करताना बोलत होते.
● भारतीय अंतराळ स्थानक सुरू करण्याचं भारताचं पहिले पाऊल हे आर्थिक विकास, वैज्ञानिक संशोधनाला प्रोत्साहन आणि अंतराळ क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असेही सोमनाथ यांनी सांगितले.

आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 30 कोटी आयुष्मान कार्डांचं वितरण
● आयुष्मान भारत – प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 30 कोटी आयुष्मान कार्ड वितरित करण्यात आली आहेत.
● या योजनेद्वारे वंचित घटकातल्या कुटुंबांना उपचारासाठी दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य कवच दिले जाते.
● देशभरातल्या 10 कोटीहून अधिक गरीब कुटुंबापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्याचा उद्देश आहे.

तैवानमध्ये डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे उमेदवार लाई चींग ते अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी
● तैवानमध्ये डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे उमेदवार लाई चींग ते यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला असून अध्यक्ष पदाकडे वाटचाल केली आहे.
● यामुळे डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीने सलग तिसऱ्यांदा ही निवडणूक जिंकण्याचा विक्रम केला आहे.
● केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार लाई चींग ते यांना 50 लाख म्हणजे एकूण मतदानापैकी 40 टक्के एवढी मते मिळाली आहेत. दुसऱ्या स्थानी असलेल्या क्यूओमिंतांगचे उमेदवार होऊ यु ईह यांना 33 टक्के तर तिसऱ्या स्थानी असलेल्या तैवान पिपल्स पार्टीचे उमेदवार को वेन जे यांना 26 टक्के मते मिळाली आहेत.

अमेरिकेचे येमेनमध्ये नव्यानं हवाई हल्ले
● इराणचे पाठबळ लाभलेल्या हुती बंडखोरांविरुद्ध अमेरिकेने आज येमेनमध्ये पुन्हा हवाई हल्ले केले.
● लाल समुद्रातून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर हल्ले करण्यासाठी हुती वापरत असलेल्या रडारच्या दिशेने हे हल्ले केल्याचं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
● अमेरिका आणि इंग्लंडनं केलेल्या संयुक्त कारवाईनंतर हुती बंडखोरांनी  पाणबुडी विरोधी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला होता. त्याला अमेरिकेनं टॉमाहॉक क्षेपणास्त्राने उत्तर दिलं. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं हुती च्या प्रवक्त्यानं सांगितलं. अमेरिका आणि ब्रिटनच्या लष्करानं काल केलेल्या हल्ल्यात किमान पाच हुती बंडखोर ठार झाले तर सहा जण जखमी झाले.

■ ‘स्वच्छ मंदिर’ (स्वच्छ मंदिर) मोहिमेची सुरुवात
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेकपूर्वी ‘स्वच्छ मंदिर’ (स्वच्छ मंदिर) मोहिमेची सुरुवात केली आहे.
● अयोध्येला भारतातील सर्वात स्वच्छ शहर बनवण्यासाठी त्यांनी राष्ट्रव्यापी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
● मोहीम नागरिकांना 14 ते 22 जानेवारी या कालावधीत तीर्थक्षेत्रे स्वच्छ करण्यासाठी प्रोत्साहित करते, उपक्रमाच्या सर्वसमावेशक स्वरूपावर जोर देते.
● या स्वच्छता मोहिमेच्या यशस्वीतेसाठी खासदार, आमदार आणि पंचायत प्रतिनिधींसह सर्व निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा सहभाग आहे.

सागरकिनारा क्रीडा स्पर्धांमध्ये मध्य
प्रदेशाची बाजी

● दीव येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या सागरकिनारा क्रीडा स्पर्धांमध्ये (Beach Games 2024, Diu) मध्य प्रदेशने बाजी मारत सर्वाधिक 18 पदके जिंकली आहेत. यात 7 सुवर्णपदकांचा समावेश आहे.
● महाराष्ट्रानं 3 सुवर्णपदकांसह एकूण 14 तर तामिळनाडू, उत्तराखंड आणि यजमान दादरा, नगरहवेली, दीव आणि दमण यांनी प्रत्येकी 12 पदके पटकावली. 

मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची सात्वीकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी अंतिम फेरीत दाखल
● मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्वीकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने कोरियाच्या कांग आणि सेउ या जोडीचा उपांत्य फेरीत 21-18, 22-20 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
● भारताच्या सात्वीकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने इतिहास रचत मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचणारे पहिले भारतीय ठरले.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment