12 जानेवारी दिनविशेष | 12 January DinVishesh | 12 January Important Facts

12 जानेवारी – घटना

1705: सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली.

1915: महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.

1931: सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबान हुसेन यांना फाशी देण्यात आली.

1936: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा.

1997: सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला बाया कर्वे पुरस्कार प्रदान.

2005: राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना.

2006: हज यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत 362 यात्रेकरुंचा मृत्यू.

12 जानेवारी – जन्म

1598: राजमाता जिजाऊ यांचा जन्म. (मृत्यू: 17 जून 1674)

1854: विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचा जन्म. (मृत्यू: 3 ऑगस्ट 1930)

1863: भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरवणारे नरेन्द्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद यांचा जन्म. (मृत्यू: 4 जुलै 1902)

1893: जर्मन नाझी हर्मन गोअरिंग यांचा जन्म. (मृत्यू: 15 ऑक्टोबर 1946)

1899: नोबेल पारितोषिक विजेते स्विस रसायनशास्त्रज्ञ पॉल हर्मन म्युलर यांचा जन्म. (मृत्यू: 12 ऑक्टोबर 1965 – बेसल, स्वित्झर्लंड)

1906 : भारतीय संस्कुतीकोशाचे संपादक महादेवशास्त्री जोशी यांचा जन्म. (मृत्यू: 12 डिसेंबर 1992)

1917: महर्षी महेश योगी यांचा जन्म. (मृत्यू: 5 फेब्रुवारी 2008)

1918: ज्येष्ठ संगीतकार सी. रामचंद्र यांचा जन्म. (मृत्यू: 5 जानेवारी 1982)

12 जानेवारी – मृत्यू

1944: लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, चित्रशाळेचे विश्वस्त वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी यांचे निधन. (जन्म: 28 एप्रिल 1854)

1966: स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगीळ यांचे निधन. (जन्म: 10 जानेवारी 1896)

1976: इंग्लिश रहस्यकथालेखिका अ‍ॅगाथा ख्रिस्ती यांचे निधन. (जन्म: 15 सप्टेंबर 1890)

1992: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व यांचे निधन. (जन्म: 8 एप्रिल 1924)

1997: हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक व अभिनेते ओ. पी. रल्हन यांचे निधन.

2005: ज्येष्ठ हिंदी चित्रपट कलावंत अमरीश पुरी यांचे निधन. (जन्म: 22 जून 1932 – लाहोर, पंजाब, पाकिस्तान)

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

2 thoughts on “12 जानेवारी दिनविशेष | 12 January DinVishesh | 12 January Important Facts”

  1. सर पूर्ण महिन्याचे एकाच वेळेस देण्या पेक्षा सर Week चे देत जान सर प्लिज.
    खूप मदत होईल तुमची,
    याने 2 फायदे होईल,
    1. 7 दिवस चे लक्ष्यात ठेवणं सोपी होईल, rather than की 30 दिवसाचे,
    2. महिन्या संपणया आधीच exam असते त्यात फायदा होईल, 1 1 मार्क च महत्त्व आहेस सर. सो प्लिज सर.
    खूप छान होईल हे सर जी.

    Reply

Leave a Comment