12 जानेवारी चालू घडामोडी नोट्स || 12 January Current Affairs Notes

■ ‘आकाश- एनजी’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
● भारताने शुक्रवारी ओदिशाच्या चांदीपूर सागरकिनारी भागात असलेल्या एकात्मिक चाचणी तळावरून (आयटीआर) वरून नव्या अद्ययावत ‘आकाश- एनजी’ क्षेपणास्त्राची (आकाश न्यू जनरेशन) यशस्वी चाचणी केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
● संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) अत्यंत कमी उंचीवर अतिवेगवान मानवरहित हवाई लक्ष्य टिपण्यासाठी ही चाचणी घेतली.
● या क्षेपणास्त्राने चाचणीदरम्यान लक्ष्य यशस्वीरित्या रोखले आणि नष्ट केले.
● स्वदेशी बनावटीचे रेडिओ फ्रिक्वेन्सी सीकर, लाँचर, मल्टी-फंक्शन रडार आणि कमांड, कंट्रोल आणि कम्युनिकेशन सिस्टमसह क्षेपणास्त्र असलेली संपूर्ण शस्त्र प्रणाली कार्यक्षम असल्याचे सिद्ध झाले.

■ किरकोळ महागाई दराचा मागील 4 महिन्यांतील उच्चांक.
● किरकोळ महागाई दराने सरलेल्या डिसेंबर महिन्यात 4 महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठली असून, तो 5.69 % वर पोहोचल्याचे शुक्रवारी सरकारी आकडेवारीने स्पष्ट केले.
● खाद्यवस्तूंच्या विशेषतः भाज्यांच्या किमती कडाडल्याने ही वाढ आहे.

हुती बंडखोरांविरूद्ध अमेरिका, ब्रिटनची संयुक्त मोहिमेला सुरुवात
● अमेरिका आणि ब्रिटनच्या लष्करानं येमेनमधल्या हुती बंडखोरांविरुद्ध संयुक्त मोहीम हाती घेतली आहे.
● त्याअंतर्गत लाल समुद्रात केलेल्या हल्ल्यात किमान पाच हुती बंडखोर ठार झाले असून अन्य सहा जण जखमी झाले आहेत.
● हुती बंडखोरांना इराणचं पाठबळ आहे, गेल्या काही दिवसांपासून या बंडखोरांकडून लाल समुद्रातून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर हल्ले करण्यात येत आहेत, त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिका आणि ब्रिटननं ही लष्करी कारवाई हाती घेतली आहे.
● या हल्ल्यांमध्येच हुती बंडखोरांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला संघटनेच्या प्रवक्त्यानं दुजोरा दिला आहे. अमेरिकेच्या या कारवाईला ऑस्ट्रेलिया, बहारिन, कॅनडा आणि नेदरलँड्सचाही पाठिंबा आहे.

जागतिक बेरोजगारीचा दर यावर्षी 5.2% पर्यंत वाढण्याची शक्यता.
● प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये बेरोजगारी वाढल्यामुळे जागतिक बेरोजगारीचा दर यावर्षी 5.2 % पर्यंत वाढण्याची शक्यता आहे, असे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने सन 2024 च्या रोजगरसंबंधीच्या एक अहवालात म्हटले आहे.
● कोरोना महामारीच्या संकटांमधून सावरल्यानंतर अल्प वाढ झाल्यानंतर एकूण श्रम उत्पादकता वाढ गेल्या दशकाच्या तुलनेत कमी वेगानं परत आल्याचे या अहवालात  म्हटले आहे. सर्वाधिक उत्पन्न असलेल्या देशांमध्ये परिस्थिती  चिंताजनक असून तिठे 2024 मध्ये रोजगार वाढ नकारात्मक होण्याची शक्यता आहे तर 2025 मध्ये रोजगार उपलब्धता स्थितीत माफक सुधारणा अपेक्षित आहेत,असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

■ दुबई शहराने ‘ट्रिपॅडव्हायझर ट्रॅव्हलर्स बेस्ट ऑफ द बेस्ट डेस्टिनेशन्स अवॉर्ड्स – 2024’ मध्ये सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावले.
● दुबई शहरानं ‘ट्रिपॅडव्हायझर ट्रॅव्हलर्स बेस्ट ऑफ द बेस्ट डेस्टिनेशन्स अवॉर्ड्स – 20224’ मध्ये सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. या पुरस्कारामुळे दुबईच्या शिरपेचात यशाचा आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
● दुबई इकॉनॉमिक्स अजेंडा, D-३३ च्या पहिल्या वर्धापन दिनी पुरस्काराची घोषणा झाली आहे. व्यवसाय, उद्योग आणि पर्यटन आदी क्षेत्रांत दुबई हे शहर जागतिक पातळीवरचे अग्रगण्य शहर म्हणून सर्वधिक लोकप्रिय आहे.

फ्रान्सचे नवे प्रधानमंत्री गॅब्रीएल अताल
● फ्रान्सचे नवे प्रधानमंत्री म्हणून गॅब्रीएल अताल यांचे नाव निश्चित झाले आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.
● अताल सध्या शिक्षणमंत्री म्हणून कार्यरत आहेत. 34 वर्षांचे अताल आधुनिक फ्रान्सच्या इतिहासातले सर्वात तरुण प्रधानमंत्री असतील. एलीसाबेथ बोर्न यांनी 20 महिन्यांच्या आपल्या कार्यकाळानंतर प्रधानमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे हा बदल होत आहे.  

ॲडलेड आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एब्डन यांचा अंतिम फेरीत प्रवेश
● भारताचा नामांकित टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एब्डन यांनी ॲडलेड येथे सुरू असलेल्या ॲडलेड आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
● काल झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात बोपण्णा आणि एब्डन या जोडीनं इक्वेडोर आणि युक्रेनच्या प्रतिस्पर्धी जोडीला 6-4, 6-4 असे पराभूत केले.
● आता अंतिम फेरीत त्यांची अमेरिकेच्या राजीव राम आणि ब्रिटनच्या ज्यो सॅलिस्बरी या जोडीशी गाठ पडणार आहे.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment