11 जानेवारी दिनविशेष | 11 January DinVishesh | 11 January Important Facts

11 जानेवारी – घटना

1787: विल्यम हर्षेल यांनी टिटानिया आणि ओबेरॉन या युरेनसच्या चंद्राचा शोध लावला.

1922: मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.

1942: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले.

1966: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.

1972: पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.

1980: बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या 14 व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.

1999: कमाल जमीनधारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी.

2000: छत्तीसगड उच्‍च न्यायालयाची स्थापना.

2001: एस. पी. भरुचा यांनी भारताचे 30 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

11 जानेवारी – जन्म

1815: कॅनडाचे पहिले पंतप्रधान जॉन ए. मॅकडोनाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: 6 जून 1891)

1858: हिंदी साहित्यिक श्रीधर पाठक यांचा जन्म. (मृत्यू: 13 सप्टेंबर 1926)

1859: ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय लॉर्ड कर्झन यांचा जन्म. (मृत्यू: 20 मार्च 1925)

1898: ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. स. खांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: 2 सप्टेंबर 1976)

1944: झारखंडचे 7 वे मुख्यमंत्री आणि खासदार शिबू सोरेन यांचा जन्म.

1955: उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका आशा खाडिलकर यांचा जन्म.

1973: क्रिकेटपटू खेळाडू द. ग्रेट इंडियन वॉल राहुल द्रविड यांचा जन्म.

11 जानेवारी – मृत्यू

1928: इंग्रजी कादंबरीकार थॉमस हार्डी यांचे निधन. (जन्म: 2 जून 1840)

1954: सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन यांचे निधन. (जन्म: 28 फेब्रुवारी 1873)

1966: भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांचे निधन. (जन्म: 2 ऑक्टोबर 1904)

1997: अर्थतज्ञ भबतोष दत्ता यांचे निधन. (जन्म: 21 फेब्रुवारी 1911)

2008: मराठी लेखक यशवंत दिनकर तथा य. दि. फडके यांचे निधन. (जन्म: 3 जानेवारी 1931)

2008: माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांचे निधन. (जन्म: 20 जुलै 1919)

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment